ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत डिंगोरे ,ओतूर खामुंडी ,उदापूर ,हिवरे खुर्द या ५ गावांत १४ रुग्ण सापडले होते. शुक्रवारी या गावांपैकी डिंगोरे २, ओतूर शहर ३, असे ५ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे परिसराची बाधितांची संख्या २ हजार ६५९ झाली आहे. यापैकी २ हजार ४४२ बरे झाले आहेत. ८६ जण कोविड सेंटर तर २६ जण घरीच उपचार घेत आहेत. आतापर्यंत परिसरातील १०५ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
शुक्रवारी ओतूर शहरात ३ नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या १ हजार १६२ झाली आहे. यापैकी १ हजार ९६ बरे झाले आहेत. १४ जण कोविड सेंटर तर १२ जण घरीच उपचार घेत आहेत. ४० जणांचा मृत्यू झाला आहे.
डिंगोरे येथे दोन नवीन रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या २७० झाली आहे, यापैकी २४५ बरे झाले आहेत. १३ जणांवर उपचार सुरु आहेत. येथील १२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.