सहकारनगर (पुणे) :सहकारनगर आरण्येश्वर भागातील गाड्यांची वर्चस्ववादातून सामान्य नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी एकोणीस आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
टोळीप्रमुख दत्ता दीपक जाधव (वय २७, रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरण्येश्वर, सहकारनगर), सचिन बबन अडसूळ (वय २९, रा. अण्णा भाऊ साठेनगर, अरणेश्वर), ऋषिकेश उर्फ ऋषी राजू शिंदे (वय २४), अमित बाबू ढावरे (वय २२), गणेश उर्फ दोड्या अनंत काथवटे (वय २२), प्रवीण बिभीषण जाधव (वय ३४ , रा. अण्णा भाऊ साठे नगर, संतनगर), ऋषिकेश रवि मोरे (वय २४, रा. शिवदर्शन घर नं. १४, पर्वती), बबन अबू अडसूळ (वय ५३, रा. अण्णा भाऊ साठे नगर, अरणेश्वर), मनोज उर्फ भुनमय उर्फ भैया किसन घाडगे (वय २६), गणेश दीपक जाधव (वय २८, रा. सदर ११), अक्षय मारुती दसवडकर (वय २७, रा. सदर १२), अर्जुन उर्फ रोहित उर्फ रोह्या संतोष जोगळे (१९), रोहित उर्फ पप्पू भगवान उजगरे (२०), शेखर उर्फ सोनू नागनाथ जाधव (३०) आणि चार बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या टोळीवर एकूण ६ गुन्हे एकत्र केल्याची नोंद असून, स्वतंत्रपणे एकूण ३ गुन्हे असे एकूण ९ गुन्हे केल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यात आहे. टोळीचा मुख्य सूत्रधार दत्ता जाधव याने गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी सर्वांना संघटित करून दहशतीच्या मार्गाने गुन्हा केल्याचे दिसून आल्याने सहकारनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी पोलिस उपआयुक्त परिमंडळ दोन स्मार्तना पाटील यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केला. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त आर. एन. राजे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपआयुक्त परिमंडळ (दोन) स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त (लष्कर) आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप देशमाने, सव्हेलन्स पथकाचे पोलिस अंमलदार यांनी केली.