पुरंदर तालुक्यात मंगळवार (दि. २०) सासवड, जेजुरी, वाल्हे व नीरा येथील शासकीय लॅबमध्ये ५२२ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी १९१ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये मंगळवार (दि. २०) २४ गावांतील ३०१ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ११२ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
सासवड शहरांमधील ५१ तसेच ग्रामीण भागातील ६० रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
सासवड ५१, दिवे येथील ७, वाघापूर ६, काळदरी, वीर, खळद येथील प्रत्येकी ५, झेंडेवाडी ४, सोनोरी, गराडे ३, सिंगापूर, पिसर्वे, भिवडी, पारगाव, उदाचीवाडी येथील प्रत्येकी २, मांडकी, आंबळे ,भिवरी, ढुमेवाडी, बेलसर, वनपुरी, आंबोडी, चांबळी, राजेवाडी, पानवडी, टेकवडी येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील १ असे एकूण ११२ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७४ संशयित रुग्णांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी १८ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
वाल्हे येथील १०, गुळुंचे ४, दौंडज, वागदरवाडी येथील प्रत्येकी १ असे एकूण १८ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये १३८ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. या पैकी ५७ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील १३, कोळविहरे, भोसलेवाडी, साकुर्डे येथील प्रत्येकी ४, धालेवाडी, रोमणवाडी, वाल्हे २, नावळी, नीरा, गुळुंचे, जवळअर्जुन, नाझरे येथील प्रत्येकी १, तालुक्याबाहेरील आंबी, मुर्टी, मोरगाव येथील प्रत्येकी ४, जोगवडी ३, पाडेगाव २, वाकी १ असे एकूण ५७ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ संशयित रुग्णांपैकी ४ रूग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नीरा येथील ३, निंबुत १ असे ४ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.