सासवड येथील शासकीय लँबमध्ये शुक्रवारी २४८ संशयीत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. पैकी १११ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. सासवड ५९, भिवडी ६, माळशिरस ५, पारगाव ४, खळद ३, वीर, दिवे, शिवरी, राजेवाडी, वनपुरी, आंबळे, चांबळी, पिसर्वे, खळद, काळेवाडी, हिवरे प्रत्येकी २, वाघापुरे, सोनोरी, वाळुंज, नारायणपूर, झेंडेवाडी, नायगाव, सोमर्डी, सुपे, उदाचीवाडी, सिंगापूर, गराडे प्रत्येकी १ असे ग्रामीण भागातील ४९, सासवड शहर ५९ तर तालुक्या बाहेरील ३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
दि.०७ एप्रिल रोजी जेजुरीच्या शासकीय लँबमध्ये घेतलेल्या ७३ आर.टी.सी.पी.आर चाचण्यांपैकी १६ रुग्णांचे प्रलंबीत कोरोना अहवाल बाधात आले आहेत. जेजुरी ०५, इंडियन सेमलेस कॉलनी नाझरे (क.प) ३, कर्नलवाडी २, वाल्हा, वीर, मावडी, जवळार्जून, जोगावडी, साकुर्डे प्रत्येकी १ असे ग्रामीण भागातील ११ व्यक्तींचे अहवाल बाधित आला आहेत.
जेजुरी येथील शासकीय लँबमध्ये घेतलेल्या ९२ संशयीत व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली पैकी ६० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी २५, साकुर्डे ०९, वाल्हे, वाळुंज, उदाचीवाडी, पिंपरे (खुर्द), कोथळे, हरणी प्रत्येकी २, नायगाव सुपे, जवळार्जून,कोळविहीरे, तक्रारवाडी, बेलसर, मावडी (क.प), पिंपरी मावडी प्रत्येकी १, तर तालुक्या बाहेरील बारामती तालुक्यातील मुर्टी ४, मोढवे, मोरगाव, आंबी प्रत्येकी १ असे तालुक्यातील ५६ व तालुक्याबहेरील ५३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
नीरा येथील शासकीय लँबमध्ये ३० संशयीत व्यक्तींचे कोरोना तपासणी करण्यात आली पैकी १० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. नीरा ३, पिंपरे (खुर्द), थोपटेवाडी, मांडकी, राख, कामठवाडी, वाल्हे व तालुक्या बाहेरील वाघळवाडी येथील प्रत्येकाला १ असे १० अहवाल बाधित आले आहेत.