शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

आला रे आला ! रत्नागिरी 'हापूस' आला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 7:44 PM

मार्केट यार्डातील फळ विभागात यंदाच्या हंगामातील पहिली रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी दाखल झाली. यंदा वातावरणातील बदलामुळे गत वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन महिने उशीरा आंब्याचा हंगाम सुरु झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात यंदाच्या हंगामातील पहिली रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी दाखल झाली. यंदा वातावरणातील बदलामुळे गत वर्षीच्या तुलनेत तब्बल दोन महिने उशीरा आंब्याचा हंगाम सुरु झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान रविवार (दि.२) रोजी फळांचे व्यापारी अनिरुध्द ऊर्फ बाप्पू भोसले यांच्या गाळ्यावर  ही पेटी दाखल झाली. पाच डझनाच्या पेटीस घाऊक बाजारामध्ये तब्बल २१ हजार ५०० रुपये दर मिळाला.दरवर्षी साधारण डिसेंबर-जानेवारी महिन्यात रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम सुरु होतो. परंतु यंदा दीड-दोन महिन्यांने उशीरा हंगाम सुरु झाला आहे. आगामी काळात देखील हापूस आंब्याची आवक साधारणच राहिल. रविवारी मार्केट यार्डामध्ये रत्नागिरी तालुक्यातील टेंभे गावातील शेतकरी सुभाष मनोहर खाडे यांच्या बागेतून हापूस आंब्याची आवक झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या हस्ते या पेटीचे पूजन केले. 

यावेळी अनिरूध्द भोसले, अनिकेत भोसले, ऋषिकेश भोसले, अजिंक्य कांचन, बलभीम माजलगावे, आडते असोसिएशनेचे उपाध्यक्ष युवराज काची, करण जाधव, प्रताप निकम, रामदास गायकवाड, भरत परदेशी, संजय वखारे, तात्या कोंडे, राजू ओसवाल, राजू पतंगे, आण्णा हराळे, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास थोपटे, राजू सूर्यवंशी, तरकारी विभागाचे प्रमुख दत्तात्रय कळमकर, फळ विभागाचे प्रमुख बाबासाहेब बिबवे उपस्थित होते. रावसाहेब कुंजीर या आडत्याने लिलावात ही पेटी खरेदी केली. यंदाच्या हंगामाबाबत अनिरूध्द भोसले यांनी सांगितले की, यावर्षी थंडीच्या लहरीपणाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. नेहमीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे मे'पर्यंत आंब्याचे दर चढेच राहणार आहेत. रत्नागिरीसह कर्नाटक आंब्याची आवक वाढल्यानंतर मेमध्ये दरामध्ये घसरण होईल. गतवर्षी १२ डिसेंबर रोजी रत्नागिरी आंब्याची आवक झाली होती. याबाबत बी. जे. देशमुख यांनी सांगितले की,शेतकऱ्यांच्या आंब्याला चांगला भाव मिळाला पाहिजे.

टॅग्स :Alphonso Mangoहापूस आंबाalphonsoहापूस आंबाmarket yardमार्केट यार्ड