शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
3
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
4
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
5
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
6
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
7
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
8
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
9
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
10
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
11
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
12
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
13
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
14
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
15
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
16
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
17
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
18
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
19
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
20
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

Maharashtra Cabinet Expansion: पुण्यात शहर अन् जिल्ह्यात ३ मंत्रीपदे; लांडगे, शिवतारेंना फोन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:31 IST

भोसरीचे आमदार महेश लांडगे, पुरंदरचे आमदार विजय शिवतारे मंत्रिपदासाठी इच्छुक होते

पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल १३ दिवसांनी मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्र्यांची निवड झाली. आता त्यांची निवड झाल्यावर १० दिवस होऊन गेल्यावर मंत्रीमंडळाचा विस्तार होत आहे. पुण्यात किमान ५ मंत्री अपेक्षित असताना पुणे शहर व जिल्ह्यात ३ मंत्रीपदे सध्या देण्यात आली आहेत. शहरातून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना फोन आले आहेत. तर जिल्ह्यातून इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांना संधी देण्यात आली आहे. आज शपथविधी कार्यक्रम नागपूरला ४ वाजता होणार असून त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून सोमवारी (दि.१६) विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनास सुरूवात होणार आहे.

जिल्ह्यातील २१ आमदारांपैकी फक्त वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बापू पठारे व खेड-आळंदीतील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे वगळता सर्व आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. जुन्नर विधानसभेतून शरद सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आलेत पण त्यांनी लगेचच शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचे २१ पैकी १८ आमदार जिल्ह्यात आहेत. त्यातील ४ जणांना सध्यातरी मंत्रीपदे देण्यात आली आहेत. 

ज्येष्ठतेमध्ये शहरात पर्वती विधानसभेच्या आमदार माधुरी मिसाळ यांचे नाव आघाडीवर होते. कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील पक्षात ज्येष्ठ आहेत, व त्यांचे मंत्रीपद फिक्स मानले जात होते. परंतु दत्ता भरणे यांचेही नाव चर्चेत होते. त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर दौंडमधील भाजपचे राहूल कूल यांचे नाव आघाडीवर होते. पिंपरी-चिंचवडमधील महेश लांडगे हेही इच्छुक आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या आमदारांमध्ये स्वत: अजित पवार उपमुख्यमंत्री आहेतच. आंबेगावमधील या पक्षाचे आमदार दिलीव वळसे ज्येष्ठ आहेत. त्यांचे नाव ही फिक्स समजले जात होते. सत्तावाटपात अजित पवार गटाला सर्वात कमी मंत्रीपदे मिळणार आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात फार कोणाला संधी देतील असा सध्या तरी दिसून येत नाही. तीच परिस्थिती शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाची आहे. त्यांचे दोन आमदार (एक अपक्ष) जिल्ह्यात आहेत. त्यातील पुरंदरचे विजय शिवतारे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा आहे. परंतु त्यांनाही अजून फोन आलेला नाही.

टॅग्स :PuneपुणेCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMadhuri Misalमाधुरी मिसाळchandrakant patilचंद्रकांत पाटीलMahayutiमहायुतीAjit Pawarअजित पवार