शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

टेम्पो-दुचाकी अपघातात २ ठार ; १ गंभीर जखमी

By admin | Published: November 20, 2015 2:44 AM

राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील डिंगोरे (ता. जुन्नर) जवळील दत्तवाडीजवळ टेम्पो व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल चालक व त्याचा २ वर्षांचा

ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील डिंगोरे (ता. जुन्नर) जवळील दत्तवाडीजवळ टेम्पो व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटारसायकल चालक व त्याचा २ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाले. तर, पत्नी गंभीर जखमी झाल्याने तिला पुणे येथे उपचारासाठी आळेफाटा येथून हलविण्यात आले आहे.या अपघातात गोविंद उर्फ सुनील सदाशिव बोकड (वय ३०) व त्यांचा दोन वर्षांचा मुलगा अनिकेत गोविंद बोकड हे दोघे जागीच ठार झाले. तर, गोविंदची पत्नी योगिता ही गंभीर जखमी झाली असून, प्रथमत: तिला आळेफाटा येथील डॉ. सोनवणे येथे प्राथमिक उपचार करून पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. हे सर्व जण पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथील आहेत.ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे खबर मिळताच त्वरित घटनास्थळी दाखल झाले. रीतसर पंचनामा करून टेम्पो व टेम्पोचालक यांना ताब्यात घेतले आहे.ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आज ओतूरचा बाजार असल्यामुळे पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथील गोविंद बोकड त्यांचा मुलगा व पत्नी हे बाजार करून त्यांच्या स्वत:च्या (एमएच १४ ह.ह. ७१०१) या क्रमांकाच्या मोटारसायकलवर पिंपळगाव जोगेकडे घरी परत जात होते. त्याच वेळी कल्याणकडून टेम्पो क्र. (एमएच ०४ डीडी ६३८२) हा भरधाव या मार्गाने ओतूरकडे येत होता. डिंगोरे जवळील दत्तवाडीपुढे मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने मोटारसायकल चालक व त्यांचा मुलगा जागीच ठार झाले व पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. आज सायंकाळी ६.१५ वाजता हा अपघात झाला. सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांचे मार्गदर्शनाखाली के. एस. साबळे पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)