शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

डेटिंग साईटवर रजिस्ट्रेशन करणाऱ्या मुलाला धमकावून २ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 8:24 PM

१७ वर्षाचा मुलगा बारावीत शिकत आहे. त्याने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली होती. याबाबत त्याच्या आईवडिलांना याची कल्पना नव्हती़. नाव नोंदणी केल्यानंतर करिमा बिबी नावाच्या एका तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला.

पुणे : उच्चभ्रू कुटुंबातील एकुलत्या एक मुलाने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली. त्यानंतर त्याला धमकावत एका तरुणीने त्याच्याकडून तब्बल १ लाख ९४ हजार रुपये उकळले. सिंहगड पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांच्या प्रयत्नामुळे बँकेने त्यातील १ लाख ५० हजार ३६६ रुपये गोठविले आहेत. हा प्रकार फेब्रुवारी ते ऑगस्ट २०१९ दरम्यान सुरु होता़.या प्रकरणी एका ४३ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्या माणिकबागेत रहात असून नोकरी करतात. त्यांचा १७ वर्षाचा मुलगा बारावीत शिकत आहे. त्याने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली होती. याबाबत त्याच्या आईवडिलांना याची कल्पना नव्हती़. नाव नोंदणी केल्यानंतर करिमा बिबी नावाच्या एका तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. तो लहान असल्याचे लक्षात आल्यावर त्याला भिती दाखविण्यास सुरुवात केली. तुझ्या घरी पोलीस येतील, तुला अटक करीत, असे सांगून त्यातून वाचायचे असेल तर बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले. त्याने आईच्या नकळत तिच्या खात्यातून ऑनलाईन पैसे या तरुणीने सांगितलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करु लागला. तो पैसे पाठविल्यावर बँकेतून येणारे मेसेज डिलिट करीत असल्याने आपल्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.  

ऑगस्ट महिन्यात त्यांना बँकेतून आलेला मेसेज पाहण्यात आला. त्यांनी पतीला आपल्या खात्यातून पैसे काढले का अशी विचारणा केल्यावर त्यांनी नाही सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलाला विचारल्यावर तो रडायला लागला. त्याच्याकडे त्यांनी विचारपूस केल्यावर त्याने सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. सायबर पोलिसांनी याची चौकशी केल्यावर संबंधित बँकेशी संपर्क साधून त्या बँक खात्यात १ लाख ५० हजार ३६६ रुपये शिल्लक असल्याचे आढळून आले. सायबर पोलिसांच्या सुचनेनुसार बँकेने हे पैसे गोठविले आहे. सिंहगड रोड पोलिसांकडे हा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके अधिक तपास करीत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस