पुणे : शहरात बुधवारी १ हजार १६४ कोरोनाबाधितांची वाढ वाढ झाली असून, २ हजार ४०७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात १० हजार ८०६ जणांनी कोरोना तपासणी करून घेतली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०.७७ टक्के इतकी आहे़
दिवसभरात ७२ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २४ जण पुण्याबाहेरील आहेत. आजचा मृत्यूदर हा १.६९ टक्के इतका आहे. आजमितीला शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही १५ हजार २३२ इतकी आहे.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ७५४ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३४८ रुग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ९२ हजार ९८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६२ हजार १७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ३९ हजार ९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ८४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
-----------