शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 10:41 PM

kamla nehru Hospital डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये एमआरआयसाठी आणलेल्या २ वर्षाच्या मुलीचा अचानक मृत्यु झाला. याप्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी, डॉक्टरांनी भुलीचं इंजेक्शन दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. शिवन्या दिनेश सोनवणे (वय २ वर्षे, रा. नाना पेठ) असे या मुलीचे नाव आहे.

याबाबत फरासखाना पोलिसांनी सांगितले की, सोनवणे हे मुळचे उरण येथील राहणारे असून सध्या ते नाना पेठेत राहतात. शिवन्या हिचा एमआरआय काढण्यासाठी तिला गुरुवारी दुपारी कमला नेहरु हॉस्पिटलमध्ये आणले होते. त्यावेळी तिला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले होते. काही वेळातच शिवन्या हिचा मृत्यु झाला. हा प्रकार तेथे असलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी याची फरासखाना पोलिसांकडे तक्रार केली.

पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सांगितले की, या प्रकरणी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या समितीने चौकशी करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. डॉक्टरांची समिती चौकशी करून अहवाल देईल. या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkamla nehru hospitalकमला नेहरु हॉस्पिटल