---
बेकारी वाढण्याला बेरोजगारी कारणीभूत
पुणे : स्वतंत्र बेरोजगार मंत्रालय आणि आयोग स्थापन करणे, सरकारी कंपन्यांचे खासगीकरण थांबवणे, अशा विविध मागण्यांसाठी सम्राट अशोक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे जनआक्रोश जनआंदोलन केले. यावेळी विनोद चव्हाण, प्रीतम ढसाळ, मोगन मनी, विवेक रुके, महेंद्र जगताप, नीता गवळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले. तसेच मुख्यमंत्री यांनी पूर्ण महाराष्ट्रात नोकर भरती सुरू करण्याचे आदेश काढले आहेत. त्याबद्दल अशोक सेनेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
-----
डॉ. विठ्ठल जाधव यांना कलागौरव पुरस्कार
पुणे : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा निळू फुले स्मृती कलागौरव पुरस्कार लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते माजी विशेष पोलीस महासंचालक विठ्ठल जाधव आणि समाजसुधारक भास्करराव कदम यांना प्रदान केला आहे. यावेळी प्रमोद सूर्यवंशी, अनिल सोमवंशी, वलय मुळगुंद, अमिता लोणकर आदी उपस्थित होते. तसेच यंदा कला महर्षी बाबुराव पेंटर स्मृती कला गौरव पुरस्कार गायक संजय गरुड, माजी सैनिक भानुदास गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब सोनवणे, नरेश पुनकर, यांना प्रदान करण्यात आला आहे.