पुणे : राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रावरून यंदा एक हजार मेट्रिक टनाहून अधिक आंबा निर्यात करण्यात आला. त्यातून सुमारे २० कोटींची उलाढाल झाली आहे. अमेरिका, युरोप, आॅस्ट्रेलिया, जपान, न्यूझिलंड, रशिया, दक्षिण कोरिया आदी देशांत आंब्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली.राज्य कृषी पणन मंडळामार्फत राज्यातील कृषी मालाचे निर्यातीसाठी धोरणात्मक उपाययोजना करून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. दिल्लीतील कृषी विकास योजनेच्या माध्यमातून आंबा उत्पादक क्षेत्रातील रत्नागिरी, देवगड, जालना, बीड, लातूर निर्यात सुविधा केंद्राची उभारणी झाली आहे.्रयंदा अमेरिकेत ५४० मेट्रिक टन, युरोपात ४४६ मेट्रिक टन, आॅस्ट्रेलियात १७, जपानमध्ये २३, न्यूझिलंडमध्ये २८, तर दक्षिण कोरियात ४० मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली, असे कृषी पणन मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.
आंब्याची निर्यातीत २० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 4:22 AM