पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि प्लॅस्टिक प्रदूषण यांसह अनेक विषय घेऊन त्यावर उपाय आणि जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामधील १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण असणार आहेत. पुण्यातील शिक्षक भवन येथे करंडकाची प्राथमिक फेरी झाली. वनराई करंडकाची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ १७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. दिवेश मेदगे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराईचे विश्वस्त नितीन देसाई, रोहिदास मोरे, अशोक बेहरे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडणार आहे.
वनराई करंडकाच्या अंतिम फेरीत २० संघ दाखल; पुण्यात झाली प्राथमिक फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:19 PM
पुणे : ‘वनराई करंडका’च्या निमित्ताने जलप्रदूषण, वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि प्लॅस्टिक प्रदूषण यांसह अनेक विषय घेऊन त्यावर उपाय आणि जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. यामधील १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण असणार आहेत. पुण्यातील शिक्षक भवन ...
ठळक मुद्देयंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी घेतला सहभाग, २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड१७ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार अंतिम फेरी, बक्षीस समारंभ