सुरेश निडबने / वालचंदनगरवालचंदनगरच्या गायकवाडवस्ती येथील कुमार नामदेव गायकवाड या प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या वडिलोपार्जित शेतीत ६ एकरांत मकापिकाची यशस्वी लागवड केली. एका एकरातून २० टन मक्याचे उत्पादन घेण्यात यश आलेले आहे. व्यापाऱ्याने जागेवर १२८० रुपये दर मिळाल्याने २० टन मका उत्पादनातून अडीच लाखांचा फायदा या शेतकऱ्यांना झालेला आहे. आॅगस्ट महिन्यात कारगिल जातीच्या मकापिकाची लागवड केली होती. योग्य नियोजनामुळेएका धाटाला दोन कणसे निघाली. वेळेवर खुरपणी तणनाशक औषध फवारणी करण्यात आली होती. पाच महिन्यांत हे मका काढण्यासाठी सुरुवात करण्यात आले. या वेळी दोनशे पोती मका उत्पादन निघाले आहे. स्थानिक व्यापारी शेतात जागेवर १ हजार २८० रुपये दराने खरेदी करण्यात आली. म्हणजे एका टनाला १२ हजार ८०० रुपये दर मिळालेले आहे. २० टन मकापिकाच्या उत्पादनातून खर्च वजा होता २ लाख रुपयांचा फायदा कुमार गायकवाड यांना झाला आहे. पश्चिमेकडील भागात शेतकरी जनावरांच्या चारा व आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी वर्षातून तीन वेळा उत्पादन मिळवून देणाऱ्या मकापिकास पसंती दर्शवतात, असे कुमार गायकवाड या शेतकऱ्याने सांगितले.
एका एकरात २० टन मक्याचे उत्पादन
By admin | Published: December 26, 2016 2:13 AM