पुणे : महापालिका प्रशासनाने यंदा मिळकतकरामध्ये सवलत मिळण्यासाठी देण्यात येणारी मुदत ३१ मे वरून ३० जूनपर्यंत वाढविल्याने पालिकेचे उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत २०० कोटी रुपयांनी घटले आहे. मुदत वाढविल्यामुळे मिळकतकर भरण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.महापालिकेच्या वतीने मागील वर्षीपर्यंत ३१ मेपर्यंत मिळकतकर भरल्यानंतर सवलत देण्यात येत होती. यंदा ही सवलत ३० जूनपर्यंत वाढविली आहे. मागील वर्षी ३१ मेपर्यंत ५५० कोटी रुपये मिळकतकरापोटी जमा झाले होते. यंदा सवलतीची मुदत वाढविल्याने ३१ मेपर्यंत केवळ ३२८ कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २०० कोटी रुपयांची घट उत्पन्नात नोंदविण्यात आली आहे. ही कसर ३० जूनपर्यंत भरून निघाली तरी २०० कोटी रुपयांवरील व्याजाचा फटका पालिकेला सहन करावा लागणार आहे.
पालिकेला २०० कोटींचा फटका
By admin | Published: June 01, 2016 2:14 AM