पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं जप्त करून ठेवलेल्या सुमारे २०० वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेक दुचाकी, कार, हातगाड्या, टेम्पो जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. हांडेवाडी येथील जेएसपीएम कॉलेज जवळच्या मैदानात हा प्रकार घडला. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.हांडेवाडी सर्व्हे क्र. ५६ येथे जेएसपीएम कॉलेज जवळील मैदानात पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई करून जप्त केलेली वाहनं ठेवण्यात आली होती. या वाहनांना आज संध्याकाळी सातच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच कोंढवा बुद्रुक आणि हडपसर अग्निशमन केंद्रातून तीन आगीचे बंब घटनास्थळी रवाना झाले. त्याशिवाय एक टँकर आणि काही खासगी टँकरच्या मदतीनं ही आग साडेआठच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली. या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
हांडेवाडीत लागलेल्या आगीत २०० वाहनं जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 11:00 PM