शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

जिल्ह्यातील २०० गावे झाली पाणीदार -यशवंत शितोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 1:55 AM

जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील २०० गावांमधील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे. या कामामुळे जवळपास ०.४२ टीएमसी पाणी साठणार आहे. सन २०१४-१५ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेची ग्रामपातळीवरून राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३५५ कामे, तर दुस-या टप्प्यात ४८० कामे करण्यात आली.

जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील २०० गावांमधील पाण्याची टंचाई कायमस्वरूपी दूर होणार आहे. या कामामुळे जवळपास ०.४२ टीएमसी पाणी साठणार आहे. सन २०१४-१५ आणि २०१६-१७ या दोन वर्षांत जलयुक्त शिवार योजनेची ग्रामपातळीवरून राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ३५५ कामे, तर दुस-या टप्प्यात ४८० कामे करण्यात आली. आता शेतक-यांनी छोटे पाटबंधारे विभागामार्फत केल्या जाणा-या जलसंधारणाच्या कामाचा योग्य पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी केले आहे.यशवंत शितोळे म्हणाले, की सन २०१५-१६ या वर्षासाठी पहिल्या टप्प्यात २०० गावांची निवड करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ३५५ कामे हाती घेण्यात आली होती. यापैकी १९५ कामांसाठी शासनाच्या विशेष निधीतून २४.१३ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता, तर जिल्हा नियोजन समिती मार्फत मिळालेल्या १३.३६ कोटी आणि जिल्हा परिषदेने १७७ कामांसाठी २१.५१ कोटींचा निधी खर्च करून ही कामे पूर्ण केली. या कामांमध्ये वळण बंधारे, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या नवीन कामांचा आणि दुरुस्तीचा समावेश करण्यात आला होता.जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून या प्रकारची आणखी १५५ कामे पूर्ण केली असून, त्यासाठी १२.९० कोटींचा निधी खर्च केला आहे. अशा प्रकारे २०० गावांमध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत ३४.४३ कोटी खर्च करून ३३२ कामे पूणे केली आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मिळून सुमारे ११८८४ सहस्त्र घनमीटर पाणीसाठा (०.४२ टीएमसी/अब्ज घनफूट) निर्माण झाला आहे.या पाणीसाठ्यामुळे १९८२ हेक्टरवर सिंचनक्षमता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे.सन २०१६-१७ या वर्षामध्ये आराखड्यानुसार १९० गावांमध्ये ४८० कामे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आली होती.नाला खोलीकरण आणि गाळ काढण्याची सुमारे १३० कामे लोकसहभागातून करणे अपेक्षित होते. निधीच्या उपलब्धतेनुसार १६६ कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ८८ नवीन आणि २८ दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे. या कामासाठी जिल्हा परिषदेस ५.६६ कोटी रुपये उपलब्ध झाले असून, त्यामध्ये ४२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत.जलयुक्त शिवार योजनेबरोबरच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या जमिनींवर गाळ अस्तरीकरण केले आहे. १३३ पाझर तलावामधून गाळ काढला असून, सुमारे १६६.८० हेक्टरवर गाळ पसरविण्यात आला आहे.शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, बारामती तालुक्यांमधील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन गाळयुक्त शिवाराला प्राधान्य दिले होते. त्यामुळे मागील काही महिन्यांत गाळ अस्तरीकरणाद्वारे जिल्ह्यातील शेतकºयांना फायदा झाला आहे.लोकसहभागातून व ग्रामपंचायतीच्या आर्थिक मदतीद्वारे पाझर तलावातील गाळ काढून शेतकºयांच्या जमिनीवर पसरविण्यात येत आहे. त्यामुळे पाझर रुंदीकरण व शेतकºयांच्या जमिनीचा पोत वाढण्यास मदत होणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाझर तलावांची साठवणक्षमता वाढण्यासाठी आणि शेतकºयांच्या जमिनींवर गाळाचे अस्तरीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेद्वारे शासनाच्या वतीने पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकºयांना परवानगी देण्यात आली आहे.पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर पाझर तलावात साचल्यास त्याचा शेतकºयांना फायदा होत आहे. तसेच उत्पदनातही वाढ होणार आहे. पाझर तलावातील गाळ काढून तलावांची पाणीक्षमता वाढविणे आणि शेतकºयांच्या जमिनींवर गाळ पसरल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होणे अशा दुहेरी फायद्यामुळे योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे यशवंत शितोळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी