शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

पुणेकरांना २०१७ बाधले डेंगीने, चिकुनगुनिया, क्षयाची लागण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 2:06 AM

पुणेकरांना २१व्या शतकातले सतरावे वरीस डेंगीच्या बाधेचे गेले. या वर्षांत सर्वाधिक ६ हजार ३९० संशयित रुग्ण डेंगीचे आढळले. त्यातही सप्टेंबर ते नोव्हेबंर या कालावधीत ७० टक्के डेंगीची बांधा झालेले संशयित रुग्ण सापडले.

- विशाल शिर्केपुणे - पुणेकरांना २१व्या शतकातले सतरावे वरीस डेंगीच्या बाधेचे गेले. या वर्षांत सर्वाधिक ६ हजार ३९० संशयित रुग्ण डेंगीचे आढळले. त्यातही सप्टेंबर ते नोव्हेबंर या कालावधीत ७० टक्के डेंगीची बांधा झालेले संशयित रुग्ण सापडले. प्रत्यक्षात १ हजार ६१९ रुग्णांना डेंगीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. पाठोपाठ क्षयबाधित रुग्णांची संख्या शहरात सर्वाधिक आहे.डेंगी आणि चिकुनगुनिया हे दोन्ही आजार स्वच्छ पाण्यात वाढणाºया डासांमुुळेच होतात. त्यामुळे फ्रिजच्या ट्रेमध्ये साठलेले पाणी, घराच्या आजूबाजूला टायर, नारळाच्या करवंट्या अथवा इतर ठिकाणी साठलेल्या पाण्यात हे डास आढळतात. शहरात वर्षभर डेंगी आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. जानेवारी ते जून या कालावधीत १९ ते ५८ इतके डेंगीचे, तर चिकुनगुनियाचे ७ ते ३६ दरम्यान रुग्ण दरमहा आढळत होते. सप्टेंबरमध्ये १ हजार ११४, आॅक्टोबरमध्ये १ हजार ८१९, नोव्हेंबरमध्ये १ हजार ७९६ आणि डिसेंबरमध्ये ४७५ डेंगीचे संशयित रुग्ण आढळले. याच कालावधीत चिकुनगुनियाचे १४०, २६२ आणि २१७ रुग्ण आढळले.दरमहा सरासरी शंभर रुग्ण क्षयाने बाधित होत असून, जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १ हजार १६३ रुग्णांची नोंद शहरात झाली. इन्फ्लुएन्झासदृश आजाराच्या ७०३ रुग्णांची नोंद झाली. या प्रकारचे सर्वाधिक रुग्ण आॅगस्टमध्ये १६१ आणि सप्टेंबरमध्ये ११५ रुग्ण आढळले. अतिसाराच्या ५७५ रुग्णांची नोंद आहे. आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक ११५ रुग्ण अतिसार बाधित होते. वर्षाचा विचार करता, आॅगस्ट ते नोव्हेंबर हा कालावधी पुणेकरांना आजारी करणारा ठरला आहे. त्याचबरोबर, फीवर आॅफ अननोन ओरिजन या नावाने ओळखल्या जाणाºया तापानेदेखील पुणेकर चांगलेच फणफणले होते. अशा आजाराच्या ९२५ रुग्णांची नोंद शहरात झाली. आॅगस्टमध्ये १२५, सप्टेंबर १४७, आॅक्टोबर २१३ आणि नोव्हेंबर महिन्यात १८७ रुग्ण आढळले. या तापाबाबत माहिती देताना महापालिकेच्या आरोग्य अधिकारी वैशाली जाधव म्हणाल्या, की हा ताप पूर्वीपासूनच आढळून येत आहे. रुग्णाला तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हा ताप सतावतो. अनेक चाचण्या करूनही त्याचे योग्य निदान होत नाही. मात्र, प्रचलित उपचारांनीच तो बरा होतो. त्यामुळे त्याला अननोन ओरिजन फीवर (अजाराचे मूळ माहित नसलेला ताप) असे म्हटले आहे.श्वसनाच्या आजारांतही वाढशहरात वर्षभरात तीव्र श्वसन विकाराचे (अक्युट रेस्परेटरी सिंड्रोम) तब्बल २ हजार ८८६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एप्रिलमध्ये ३६०, जुलै ५४०, आॅगस्टमध्ये ६४८ रुग्ण आढळून आले.सरासरी पाहिल्यास दररोज ८ रुग्ण या विकाराला बळी पडत होते. ‘वाढलेले प्रदूषण आणि वातावरण बदलामुळे अशा आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यातही प्रदुषणाचाच टक्का हा निम्मा असेल.ऋतु बदलताना अथवा वातावरमात झालेल्या अचानक बदलामुळे विषाणुंसाठी पोषक वातावरण निर्माण होते. व्यायामाच्या आभावामुळे बाह्य प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे असे आजार वाढत असल्याचे’ डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.७०३ स्वाइन फ्लूचे रुग्ण९ लाख १ हजार ५६० गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूच्या संशयावरुन रुग्णांची तपासणी केली.२६ हजार ४४ रुग्णांचा टॅमी फ्लू औषध देण्यात आले असून, ३ हजार २२६ रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाची (स्वॅब) चाचणी करण्यात आली.७०३ रुग्णांना प्रत्यक्ष स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील चाचणीत निष्पन्न झाले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPuneपुणे