बारामती: संत तुकाराम महाराजांच्या पालखी बंदोबस्तादरम्यान बारामती क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत एका गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त केली. एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गणेश भीमराव पडळकर (रा. वायसेवाडी, अकोले, ता. इंदापूर, जि.पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्ताच्या अनुषंगाने क्राईम ब्रँच बारामती येथे गुन्हेगार चेक आणि काँबिंग कारवाई करत असताना गोपनीय माहिती मिळाली. वायसेवाडी, अकोले (ता. इंदापूर) येथे एका व्यक्तीकडे बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि कडतुसे बाळगून आहे. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली छापा घातला असता आरोपी पडळकर याच्याकडे गावठी कट्टा, ६ मोठे, १५ लहान असे २१ जिवंत काडतुसे, एस्ट्रा मॅगझीन असा एकूण २४ हजार रूपयांचा माल मिळून आला. सदर आरोपीने काही काडतुसे जवळपासच्या डोंगरात गावठी कट्ट्यासोबत वापरली आहेत, अजून काही काही हत्यारे कोणाला दिली अगर कसे याबाबत तपास सुरू आहे. या कारवाईमध्ये बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर यादव यांच्यासह स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, रमेश केकान, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, शर्मा पवार, स्वप्नील जावळे, रॉकीदेवकाते यांनी सहभाग घेतला.———————————
बारामतीत पालखी बंदोबस्तादरम्यान गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 5:56 PM
संत तुकाराम महाराजांच्या पालखी बंदोबस्तादरम्यान गावठी कट्ट्यासह २१ जिवंत काडतुसे जप्त केली...
ठळक मुद्देबारामती क्राईम ब्रँचची कारवाई