पुणे : जिल्ह्यांतील धरणक्षेत्रात बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळपर्यंत २१.०५ अब्ज घनफुटांवर (टीएमसी) पोहोचला होता. इतर प्रमुख धरणांमधील पाण्याची टक्केवारी साठीच्यावर गेली आहे. पावसाचा जोरही मंदावला आहे.खडकवासला पाणलोट क्षेत्रातील खडकवासला धरणक्षेत्रात २, पानशेत ११, वरसगाव ९ आणि टेमघरला ४६ मिलिमीटर पाऊस झाला. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत टेमघरला ११४, वरसगाव ५३, पानशेत ५२ आणि खडकवासला येथे ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. पानशेत धरणात ९.३३ (८७.६० टक्के), वरसगाव ७.५२ (५८.६८ टक्के) आणि टेमघरला २.२२(५९.९७ टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणातील पाणीसाठा २१.०५ टीएमसीवर (७२.२० टक्के) पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात चारही धरणांत मिळून पावणेचौदा टीएमसी पाणीसाठा होता.।भाटघर , नीरादेवघर ६४.६० टक्के भरलेगुंजवणी धरणक्षेत्रात बुधवारी दिवसभरात १२, नीरा ३६ आणि भाटघरला ५ मिलिमीटर पाऊस झाला, तर बुधवारी ८ पर्यंत या धरणक्षेत्रात अनुक्रमे ३८ मिलिमीटर, ६१ आणि २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुंजवणी धरणांत २.३४ टीएमसी (६३.४२ टक्के), नीरादेवघर ७.५८ (६४.६० टक्के) आणि भाटघर १५.१४ (६४.४० टक्के) टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पवना धरणक्षेत्रात १३ आणि भामा आसखेड धरणक्षेत्रात बुधवारी दिवसभरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी सकाळी पवना धरणक्षेत्रात ८६ आणि भामा आसखेडला ४१ मिलिमीटर पाऊस झाला. पवना धरणात ६.८५ (८०.५ टक्के) आणि भामा आसखेडमध्ये ५.२८ टीएमसी (६८.८ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
खडकवासला प्रकल्पात २१ टीएमसी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 1:21 AM