लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने १०९ हॉटस्पॉट गावे तसेच ३०० बाधित गावांमध्ये मंगळवार आणि बुधवारी दोन दिवस धडक सर्वेक्षण राबविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. दोन दिवस चाललेल्या या धडक सर्वेक्षणात २१ हजार चाचण्या ग्रामीण भागात करण्यात आल्या. त्यात ४२२ नागरिक कोरोनाबाधित आढळले आहे. हे रुग्ण लक्षणेविरहीत असून वेळीच निदान झाल्याने त्यांच्यापासून इतरांना असलेला धोका टळला आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागात ही संख्या आटोक्यात येत नव्हती. जिल्ह्यात हॉटस्पॉट गावांची संख्या ही शंभरच्यावर आहे. जवळपास १०९ गावात १० पेक्षाही अधिक रुग्ण आहेत. तर ३०० हून अधिक गावात किमान १ रुग्ण आहे. या गावांमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित दर जास्त होता. यात नगरपालिका क्षेत्राचाही समावेश आहे. यामुळे या गावात कोरोना नियंत्रणात आणण्यसाठी १३ आणि १४ जुलैला सर्वाधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत धडक सर्वेक्षण मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले होते. प्रत्येक पथकाला ५० घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या घरातील बाहेर पडणाऱ्या प्रत्येक एका नागरिकाची अॅन्टिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. दोन दिवसांत जवळपास २१ हजार नागरिकांच्या अॅन्टिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यात जवळपास ४२२ नागरिक कोरोनाबाधित आढळले. त्यांना संबंधित तालुक्याच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
२१ हजार चाचण्यांपैकी ८ हजार ६३७ नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर उर्वरित १२ हजार २८८ जणांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्या दरम्यान आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दोन दिवसांत या ठिकाणी १०७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
ग्रामीण भागात सध्या शेतीकामांसाठी नागरिक बाहेर पडतात. या सोबतच भाजीपाला विक्रीसाठी ते बाजारात येत असतात. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या ही जास्त असू शकते, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ‘लोकमत’ला दिली. जिल्हा परिषदेतर्फे कोरोना प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे धडक सर्वेक्षण राबविण्यात आले. या पूर्वी फक्त आशासेविकांमार्फत प्रत्येक घरात जाऊन आजारी व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. येत्या काळात ही माेहीम आणखी तीव्र करण्यात येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करून गावे ही कोरोनामुक्त करण्याचे आमचे धोरण आहे, असेही आयुष प्रसाद म्हणाले.
चौकट
वेल्हा तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही
वेल्हा तालुक्यातही आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, या तालुक्यात एकही कोरोनाबाधित व्यक्ती आढळला नाही. तालुक्याची लोकसंख्या विरळ असल्याने तसेच बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण इतर तालुक्याच्या प्रमाणात कमी आहे. यामुळे तालुक्यात कोरोना प्रसार नियंत्रणात आहे. तालुक्यात फक्त दोन हॉटस्पॉट गावे आहेत, अशी माहिती वेल्हेचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी सांगितले.
चौकट
सर्वेक्षणात २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा सहभाग
दोन दिवस चालणाऱ्या या सर्वेक्षण माेहिमेत २ हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग नोंदवला. यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांचा समावेश होता.
ग्रामीण भागातील कोरोना बाधितांचे प्रमाण गेल्या ४ आठवड्यांपासून ७ टक्क्यांहून अधिक आहे. हा दर ४ टक्क्याच्या खाली आणण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाचे आहे. कोरोनाबाधित जास्त असल्याने जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. या सोबतच सर्व तालुक्यात आणि नगरपालिका क्षेत्रातील हॉटेल, रेस्टॅारन्ट आणि भोजनालयात बसून जेवणाची परवानगी प्रशासनाने नाकाराली आहे.
कोट
या धडक सर्वेक्षण मोहिमेत दोन दिवसांत ४२२ बाधित आढळले. त्यांची चाचणी केली नसती तर हे बाधित लोक इतरांमध्ये मिसळले असते. यामुळे बाधितांमध्ये आणखी वाढ झाली असती. हे रोखण्यासाठीच ही सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून येत्या काळात ही मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी
कोट
आम्ही आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचण्या सर्वेक्षणात घेतल्या आहेत. एखाद्या व्यक्तीने चाचणी करण्यास नकार दिला तर आम्ही त्याच्या कुटुंबातील सदस्यांची, जवळच्या संपर्कांची आणि ओळखीची व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी केली. या माध्यमातून विषाणूचा होणारा प्रसार आम्हाला रोखता येणार आहे.
- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
चौकट
धडक सर्वेक्षण मोहिमेत दोन दिवसांत जवळपास ५ लाख घरांना भेटी देण्यात आल्या. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठांचाही समावेश करण्यात आला. येत्या काळात ही मोहीम आणखी तीव्र करण्याचा विचार जिल्हा परिषदेचा आहे. सर्वाधिक हॉटस्पॉट गावांची संख्या ही आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात आहे.
मोहिमेदरम्यान या गावांमधील .०.०7 ???? लाख घरे कव्हर केली गेली आहेत.
नारायणगाव, जुन्नर, भिगवण इत्यादी मोठ्या बाजारपेठा / बाजारपेठांचा समावेश आहे.
झेडपीची योजना अधिक आरोग्य कर्मचा-यांना रोखून मोहीम अधिक तीव्र करण्याची योजना आहे.
जास्तीत जास्त हॉटस्पॉट गावे जुन्नर व आंबेगाव तहसील आहेत.
जुन्नर आणि आंबेगावमध्ये विवाह, भाज्यांची बाजारपेठ आणि व्यापारी शहरांमध्ये गर्दी वाढल्याची घटना जि. प. अधिका-यांनी व्यक्त केली.
गेल्या चार आठवड्यांत या खेड्यांमधील कोविड प्रकरणांच्या कलमाचा अभ्यास केल्याचा दावा झेडपीने केला आहे.
त्यात सकारात्मक घटनांमध्ये सुसंगतता नोंदली गेली आहे.
चांगल्या समन्वयासाठी आणि लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा यासाठी जिल्हा परिषद अधिका-यांनी या गावांच्या सरपंचांशी दोन ऑनलाइन बैठक घेतल्या.
कोविडची प्रकरणे ग्रामीण भागातील ग्रामीण भागात कमी झाली असल्याने झेडपीची चाचणी यादी सध्या वापरात आहे. म्हणूनच, या गावात मोठ्या प्रमाणात चाचणी मोहीम राबविण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.