पुणे : शहरात मंगळवारी २१६ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ८८४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.६७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजार ५४८ असून, आज दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ५ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २२२ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३२८ इतकी आहे. शहरात आतापर्यंत २८ लाख ५० हजार १६४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ७८१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७४ हजार ७८१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातील कोरोनास्थिती
मंगळवारी बाधित : २१६
आज घरी सोडले : ३०४
एकूण बाधित रुग्ण : ४, ८६, ७८१
सक्रिय रुग्ण : २, ५४८
आजचे मृत्यू : ११
एकूण मृत्यू : ८, ७४२