पुणे - बालकामगार प्रथा निर्मूलनासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या कृतिदलाकडून २००६ ते मे २०१८ पर्यंत घालण्यात आलेल्या ३८७ छाप्यांमधून २१८ बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांमार्फत २०७ मुलांना बालगृहात दाखल करण्यात आले असून, १४० आस्थापनांच्या मालकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये ९७ फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र शासनाच्या बालकामगार प्रथा निर्मूलनासंबंधी जिल्हास्तरावर कृतीदल स्थापन करण्यात येते. पुणे कार्यालयाने कृतीदलामार्फत २०१८ पर्यंत ३८७ छापासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६९८० आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४७ आस्थापना मालकाकडे कामास असलेले १७३ बालकामगार व ४५ किशोरवयीन मुले अशा एकूण २१८ मुलांना मुक्त करण्यात आले. बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून नुकताच पुढे आले आहे. आजही खाद्यस्टॉल, वीटभट्टी या ठिकाणी अनेक लहान मुलांना कामास ठेवण्यात येते. त्यांना कामास ठेवून त्यांचे बालपण एका अर्थाने हिरावून घेण्यात येते.कृतीदलातर्फे विविध ठिकाणी छापेबालकामगार प्रथा निर्मूलनासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृतीदलामार्फत विविध ठिकाणी छापे टाकण्यात येतात. या छाप्यांच्या माध्यमातून एखाद्या ठिकाणी बालकामगार आढळल्यास मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येतो.२००६ ते २०१८ या कालावधीत पुणे जिल्ह्यातील १४० आस्थापनांच्या मालकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये ९७ फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. २०१६ या वर्षात १० बालकामगारांची मुक्तता करण्यात आली होती. तर २०१७ व २०१८ या वर्षात प्रत्येकी केवळ एका बालकामगाराची मुक्तता करण्यात आली आहे.१४ वर्षांखालील लहान मुलांना कामाला ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे तसेच १४ ते १८ वर्षांखालील मुलांना धोकादायक ठिकाणी कामास ठेवणे हाही गुन्हा आहे.यात दोषींना २० ते ५० हजार रुपये दंड किंवा १ ते ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्याच व्यक्तीने दुसऱ्या वेळेस गुन्हा केल्यास त्याला थेट शिक्षा केली जाते.लहान मुलगा दुसºया वेळेस बालमजुरी करताना आढळल्यास त्याच्या पालकांनाही दंड आकारण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
२१८ बालकामगारांची सुटका, पुणे जिल्ह्यातील १२ वर्षांतील कारवाईची आकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 3:09 AM