घोडेगाव : आंबेगाव तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये राष्टवादी काॅंग्रेस दिलीप वळसे पाटील गटाकडे 22 तर 5 अपक्ष, 2 शिवसेना शिंदे गट व 1 राष्टवादी काॅंग्रेस शरद पवार गटाकडे गेल्याचे प्राथमिक चित्र समोर आले आहे. वळसे पाटील गटाकडे जास्त ग्रामपंचायत गेल्या असल्या तरी निरगुडसर व पारगांव ग्रामपंचायत त्यांच्याकडून गेल्याने मोठा धक्का बसला आहे.
राष्टवादी काॅंग्रेस पक्ष दिलीप वळसे पाटील गटाकडून दावा करण्यात आलेल्या ग्रामपंचायत व सरपंचांची नावे पुढिल प्रमाणे - अवसरी बुद्रूक सारिका रत्नाकर हिंगे, मांदळेवाडी उज्वला आतुल आदक, पोंदेवाडी निलीमा अनिज वळुंज, जाधववाडी अर्चना विशाल जाधव, नांदुर पुनम सचिन वायाळ, ठाकरवाडी आशा खंडु पारधी, चास अर्चना दौलत बारवे, गोहे बुूद्रूक महादु भागु भवारी, चपटेवाडी शकुंतला धादवड, डिंभे बुद्रूक शंकर मिलखे, फुलवडे बबन नारायण मोहरे, पिंपरगणे मंदा चिमाजी सातपुते, पाटण लक्ष्मण महादेव मावळे, कुशिरे बुद्रूक भिमाबाई शिवाजी धादवड, फलौंदे नामदेव रामजी मेमाणे तर बिनवीरोध मधील कोलतावडे संगिता काशिनाथ वालकोळी, कानसे सविता विशाल वाळुंज, सुपेधर शंकर बाबुराव गांगड, महाळुंगे तर्फे घोडा रोहिणी प्रविण कोकणे, तळेकरवाडी आशिष विलास तळेकर, पहाडदरा मच्छिंद्र शिवराम वाघ, जारकरवाडी प्रतिक्षा कल्पेश बढेकर, वाळुंजनगर तृप्ती महेंद्र वाळुंज यावर दावा केला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे निरगुडसर ग्रामपंचायतवर रविंद्र जनार्दन वळसे व टाव्हरेवाडी ग्रामपंचायतवर कविता नवनाथ टाव्हरे यांची निवड झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर राष्टवादी काॅंग्रेस शरद पवार गटाकडून पारगांव तर्फे अवसरी बुद्रूक श्वेता किरण ढोबळे यावर दावा करण्यात आला आहे. तर गावपातळीवर आघाडयां मिळून अपक्ष म्हणून चांडोली खुर्द प्रियंका शांताराम भागित, लोणी सावळेराम नाईक, तांबडेमळा प्राजक्ता विजय तांबडे, बोरघर विजय नारायण जंगले, टाकेवाडी प्रीती राहुल चिखले या सरपंचपदी निवडूण आले आहेत.
मतमोजणी घोडेगाव तहसिल कार्यालयात तहसिलदार संजय नागटिळक यांच्या नियंत्रणाखाली शांततेत पार पडली. मतमोजणी नंतर तहसिल कार्यालयाच्या बाहेर विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळत व फटाक्यांची आतिषबाजी करत विजय साजरा केला.
आंबेगाव तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका झाल्या. यातील पोंदेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तर उर्वरीत ग्रामपंचायतच्या सदस्य पदासाठी निवडणूक झाली. यातील पोंदेवाडी ग्रामपंचायतीवर राष्टवादी काॅंग्रेस दिलीप वळसे पाटील गटाच्या निलीमा अनिज वळुंज सरपंचपदी निवडूण आल्या.