पुणे : पुण्यात वर्षाकाठी जवळपास साडेतीनशे ते चारशे नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. त्यामुळे हे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे आव्हान पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी वाहतूक शाखेला दिले आहे. शहरातील २२ ‘अॅक्सिडेंटल स्पॉट्स’ची यादी तयार करण्यात आली असून, ही यादी महापालिकेला देण्यात आल्याची माहिती के. व्यंकटेशम यांनी दिली.
पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी विशेष बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील वाहतुकीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात विचारमंथनासोबतच नियमनावर अधिक भर देण्यासंदर्भात आयुक्तांनी सूचना केल्या. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या कामामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. यासोबतच नागरिकांचे प्रबोधन करण्यावरही भर द्यावा, नॅशनल रोड काँग्रेसच्या नियमावलीचा अभ्यास करावा, असे सांगण्यात आले. शहरामध्ये मागील काही वर्षांत अपघातांची संख्या वाढते आहे. त्यामध्ये प्राणांतिक अपघातांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे गंभीर आणि प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु करणार आहेत. दरवर्षी अपघातांमध्ये मृत्यू पावणाºयांची संख्या ५० टक्क्यांनी खाली आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखणार आहे. शहरातील सर्वाधिक अपघात घडणाºया २२ ठिकाणांची यादी वाहतूक शाखेने तयार केली आहे. ही यादी पालिकेला दिली आहे. पालिकेने या ठिकाणांवर सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद केल्याचेही व्यंकटेशम यांनी सांगितले. या ठिकाणांवर सूचनाफलक व दिशादर्शक फलक लावण्यात येतील. यासोबतच नागरिकांचे प्रबोधन करून गतीवर नियंत्रण, वाहनांची देखभाल, वाहतूक नियमांचे पालन याविषयी जनजागृती करणार आहे. वाहतूक समस्या ही शहराची सर्वांत मोठी समस्या आहे. वाहनांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढत नाही. त्यातच अतिक्रमणांमुळे रस्ते आकुंचित होत आहेत. पुणे शहर दुचाकींचे शहर आहे. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाºयांमध्ये सर्वाधिक संख्या दुचाकी चालकांचीच आहे.शहरातील रस्त्यांवरून विरुद्ध बाजूने आणि नो एंट्रीमधून येणाºया वाहनांच्या समस्येविषयी ‘लोकमत’ने बुधवारी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस आयुक्तांनी मागील दोन महिन्यांमधील वाहतूक समस्येविषयी प्रसिद्ध झालेल्या माध्यमांमधील बातम्यांची कात्रणे काढण्याच्या सूचना केल्या.या कात्रणांचे ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’ तयार करून घेतले. हे प्रेझेंटेशन आयुक्तांनी गुरुवारी वाहतूक शाखेच्या अधिकाºयांसमोर मांडून शहरातील वाहतूक समस्यांचा आढावा घेत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाºयांना सूचना केल्या. तसेच उपायही सुचविले.हेल्मेट वापराबाबत सध्या विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रबोधन करीत आहेत.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गेटच्या आतमध्ये हेल्मेट सक्ती करावी, हेल्मेट नसल्यास महाविद्यालयात प्रवेश देऊ नये अशा आशयाचे पत्र शहरातील महाविद्यालयांना देण्यात आले आहे.४यासोबतच शहरामध्ये हळूहळू हेल्मेट कारवाईला वेग देण्यात येणार आहे.आम्ही पुण्याची वाहतूक समस्या आणि त्यावरील उपायांसाठी पुढाकार घेऊन कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील २९५/२०१२ या याचिकेनुसार देशभरातील प्राणांतिक अपघातांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील आहे. त्यातही पुण्यातील संख्या मोठी आहे.टक्क्यांनी अपघात कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहरातील २२ धोकादायक ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक व्हायची असेल तर ३० टक्के पोलिसांचा वाटा असतो.टक्के स्थानिक स्वराज्य संस्था आणि उर्वरित नागरिकांचा सहभाग आवश्यक असतो. आम्ही शहरातील हेल्मेट कारवाईला गती देणार आहोत. हेल्मेटच्या दंडाच्या रकमेत नवीन हेल्मेट विकत घेता येऊ शकते.सध्या वाहनचालकांकडून आॅनलाइन चलान घेतले जाते. मात्र, अनेकदा त्याचे पैसे भरायला जायला जमत नाही. त्यामुळे वाहतूक शाखेने बँका आणि पोस्टामध्ये खाते उघडावे. या खात्यामध्ये नागरिक तडजोड शुल्काची रक्कम भरू शकतील. त्यामुळे पोलीस आणि नागरिक दोघांचाही वेळ वाचेल.राज्याच्या मुख्य सचिवांनी बुधवारी मुंबईमध्ये राज्यातील अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज्यातील वाहतूक समस्येबाबत तसेच अपघातांची संख्या कशी कमी करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते गेल्या होत्या.
‘सेफ अॅन्ड स्मूथ’ वाहतुकीसाठी कालबद्ध कार्यक्रमशहरातील २२ ‘अॅक्सिडेंटल स्पॉट्स’ची केली यादी