प्रतवारीनुसार १० किलोचे भाव : नं १ (गोळा कांदा) १७० ते २०० रपये. नं २- (सुपर कांदा) १३० ते १७० रुपये. नं ३ (गोलटा कांदा) ९० ते १३० रुपये, नं ४ (गोलटी/बदला) २० ते ९० रुपये. बटाटा बाजारभाव : ओतूर बाजारात गेले दोन आडवडे बटाटा व लसूणची आवक नव्हती. परंतु गुरुवारी १७ बटाटा पिशव्यांची आवक होऊन १० किलोस प्रतवारीनुसार ५० रुपये ते १३० रुपये भाव
मिळाला.
लसूण फक्त १ पिशवी आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस २०० रुपये ते ६००रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती ओतूर मार्केट चे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.