राजगुरूनगर (पुणे) : दावडी (ता. खेड ) येथे मित्राबरोबर आलेला युवकाला पाण्यात पोहता न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना घडली आहे. सचिन विभिषण घारगे ( वय २२ रा. तळवडे ता. हवेली) असे पाण्यात वाहून गेले युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ५ रोजी, सचिन घारगे, शिवप्रकाश माने, विशाल चव्हाण आदित्य पाटील असे बहुळ येथे एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सर्व मित्र पोहण्यासाठी आमराळवाडी दावडी येथून जाणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर आले होते.
कालवा तुंडूंब भरून वाहत असल्याने सचिन घारगे हा मित्राला म्हणाला मला पोहता येते, असे म्हणून तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला पण त्याला पोहता आले नाही. पाण्याचा प्रवाहाबरोबर तो वाहून गेला, त्याचा मित्रांनी शोध घेतला परंतु तो उद्याप मिळून आला नाही. या घटनेबाबत सचिन घारगे याचा मित्र अक्षय श्रीराम गायकवाड (रा. आळंदी देवाची ता. खेड ) याने खेड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.