पुणे : पुणे महापालिकेत अखेर २३ गावांचा नव्याने समावेश करण्यावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आला आहे. यामध्ये खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे धावडे, मांजरी बुद्रूक, न्यू कोपरे,नऱ्हे,पिसोळी,शेवाळवाडी,काळेवाडी,वडाची वाडी,बावधन बुद्रूक,वाघोली, नांदेेड मांगडेवाडी, भिलारेवाडी,गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, ांसणसनगर, नांदोशी, सूस, म्हाळुंगे आदी गावांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून पुणे महापालिकेच्या हद्दवाढीचा अध्यादेश बुधवारी काढण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदेशानं जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.
...तर पुणे महापालिका राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरणारराज्य सरकारने अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय घेतला असून, बुधवारी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. याचवेळी या निर्णयाबाबत हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहे. ३० दिवसांमध्ये पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे त्या लेखी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचा विचार करून गावांच्या समावेशाचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे भविष्यकाळात पुणे ही राज्यातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरणार आहे.
या समाविष्ट गावांपैकी तीन गावांची ग्रामपंचायत निवडणूक घेण्यास विरोध करणारी याचिका हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली होती. त्यानंतर सरकारने अवघ्या २४ तासांत ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अधिसूचना काढली आहे. या तीन गावांच्या निवडणुकांना स्थगिती देऊन त्या तीन महिने पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.