पुणे : मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या २३ वर्षीय तरुण ब्रेन डेड झाला. त्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्यास परवानगी दिल्याने त्याच्या अवयदानातून पाच जणांना जीवनदान मिळाले. पुणे विभागात गेल्या दहा महिन्यात ४५ मेंदूमृत रुग्णांनी केलेल्या अवयवदानामुळे १२५ रुग्णांना अवयव मिळाले आहे. या रुग्णाने यकृत, किडनी, हृदय, फुफ्फुसे आणि स्वादुपिंड डीवाय पाटील हॉस्पिटलला आणि एक किडनी पूना हॉस्पिटलला देण्यात आली. प्रत्यारोपण केलेल्या सर्व रुग्णांची तब्येत स्थिर आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवयव प्रत्यारोपणाच्या संख्येतही वाढ झाली आहे. पुणे विभागात गेल्या वर्षी ४६ ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान झाले होते. या अवयवदानामुळे ११५ अवयव प्राप्त झाले होते. तर यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ४५ मेंदूमृत रुग्णांचे अवयवदान करण्यात आले. यातून १२५ अवयव मिळाले आहेत.
पुणे विभागात यंदा झालेले अवयव प्रत्यारोपण
फफ्फुस : १०मूत्रपिंड आणि यकृत : १मूत्रपिंड : ५४यकृत : ३५मूत्रपिंड आणि स्वादुपिंड : ७हृदय : ८