पुणे : यंदा प्रथमच जिल्हा वार्षिक नियोजनचा संपूर्ण निधी जिल्हा परिषदेला मिळाला असून, याच्या २३८ कोटी रुपयांचा विकासकामांच्या आराखड्याला जिल्हा परिषदेने नुकतीच मंजुरी दिली आहे. २0१५-२0१६ चा हा आराखडा जिल्हा नियोजन समितीला सादरही केला आहे.जिल्हा नियोजनच्या निधीतील कामांचा आराखडा तयार करणे आणि आराखड्याला मंजुरी देण्याचे अधिकार हे जिल्हा परिषदेला मिळाले आहेत. त्यानुसार २0१५-१६ या वर्षासाठी २३८ कोटींचा निधी मिळाला. याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मंजुरी दिल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकारांना दिली.यात महिला आणि बालकल्याण विभागासाठी १७ कोटी ५० लाख समाजकल्याण विभागाला २७ कोटी ६५ लाख, शिक्षण ४ कोटी ४१ लाख, पंचायत विभागाला ४४ कोटी ३४ लाख, छोटे पाटबंधारे विभागासाठी २६ कोटी २६ लाख, बांधकाम उत्तर १७ कोटी आणि दक्षिण १६ कोटी, आरोग्य ३८.७७ कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला २५ कोटी २७ लाख, पशुसंवर्धन ११ कोटी ८८ लाख आणि कृषी विभागाला ७ कोटी २१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यात सर्वाधिक ४४ कोटी ३४ लाख पंचायत विभागाला मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजना ३८० कोटी रुपयांची आहे. मात्र या योजनेतील जिल्हा परिषद क्षेत्रातील विकास कामे त्यांचे नियोजन आणि ती करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेची आहे. या वर्षीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आल्याने प्रथमच एवढा मोठा निधी जिल्हा परिषदेला मिळाला आहे. या निधीतून तालुक्यांना समान वाटप करण्यापेक्षा अनुषेष असलेल्या तालुक्यांना जादाचा निधी देण्याचा प्रयत्न असल्याचे कंद यांनी सांगितले.
वार्षिक नियोजनातून जिल्हा परिषदेला २३८ कोटी
By admin | Published: June 14, 2016 4:37 AM