शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-गोवा महामार्गाची गडकरींनी दिली नवी तारीख; म्हणाले, सर्व खटले मिटले...
2
युट्यूबर पत्नीला तिच्या सहकारी युट्यूबरसोबत नको त्या अवस्थेत पाहिले...; लगेचच तिने बाजुला पडलेली ओढणी...
3
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, कॉलही करणार; MPSC विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार काय म्हणाले?
4
गुगल आपले डोमेन बदलणार, तुमच्या ब्राऊझरच्या अ‍ॅड्रेस बारवर हे दिसणार...; घाबरू नका, पण सावध रहा...
5
५५ हजारांवर येण्याचं स्वप्न भंगलं; एका दिवसात सोन्याच्या दरात १३०० रुपयांपेक्षा अधिक वाढ, नवे दर काय?
6
Kitchen Tips: फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड, हे ओळखण्याच्या 'खास' टिप्स!
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यक्रमाला बोलावणार? गोपिचंद पडळकरांनी स्पष्टच सांगितलं...
8
मुलीने मारला वडिलांच्याच घरावर डल्ला, नवऱ्याच्या मदतीने चोरले ९० लाख; एका चुकीने पर्दाफाश
9
मुलींकडील आयपॅड काढून घेतले, अभ्यास करायला सांगितले, आईची थेट तुरुंगात रवानगी, पोलिसांनी केली कारवाई 
10
IPL 2025 मध्ये फिक्सिंगचा प्रयत्न सुरू, खेळाडूंच्या कुटुंबीयांना केलं जातंय टार्गेट, मास्टरमाइंड कोण?
11
"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान   
12
"मुर्शिदाबादचा हिंसाचार सुनियोजित कट, घुसखोरांना का येऊ दिलं गेलं?"; ममतांचा सवाल
13
धमाल! आता WhatsApp वर तुम्ही ठेवू शकता मोठं स्टेटस; १ मिनिटाची लिमिट कितीने वाढवली?
14
आयएमएचा डॉ घैसासांना पाठिंबा! ही बाब अत्यंत खेदजनक, अमित गोरखेंची टीका
15
डीअर क्रिकेट, गिव्ह मी वन मोअर चान्स! क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या करुण नायरची गोष्ट
16
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' स्टॉक, झुनझुनवालांकडे आहेत १३ कोटींपेक्षा अधिक शेअर; किंमत ₹९५ पेक्षा कमी 
17
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीपासून ॐकार साधना सुरू करा आणि अगणित लाभ मिळवा!
18
१०० कोटींची ऑर्डर! "१२०० फूट खोल खाणीत...", मुलीला शेवटचा मेसेज, लक्ष्मण शिंदेंची अपहरण करून हत्या
19
तुम्हाला श्रीमंत बनवणाऱ्या SIP चे १० सीक्रेट; कोट्यधीश होण्याचे गणित समजून घ्या
20
दीड लाखाचे व्याज माफ, म्हाडाचा निकाल; बिल्डरने आकारलेली वाढीव रक्कम रद्द करण्याची सूचना

आळंदीत कार्तिकी यात्रेसाठी २४ तास पोलिसांचा कडक बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 19:18 IST

शहरात पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२६ वा संजीवन समाधी दिन सोहळा तथा कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीला वेग आला आहे. शहरात पोलीस बंदोबस्त, पास व्यवस्था, पाणी व्यवस्था, दर्शनबारी, आरोग्य सुविधा यांची तयारी सुरु आहे. शहरात प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. मंदिरात भाविकांना माऊलींच्या दर्शनाची व्यवस्था सुरु आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी शहरात जंतुनाशक धुर फवारणी करण्यात येत आहे. देखभाल दुरुस्तीचे कामही पूर्णत्वास येत आहे. टाळ, पखवाज, फुल - प्रसादाची दुकाने गजबजली आहेत. शहरात ठिकठिकाणी दुकाने, तात्पुरती हाॅटेल्स उभारणी सुरु आहे. विशेषतः कार्तिकी यात्रेसाठी २४ तास सुमारे अडीच हजार पोलिसांचा खडा पहारा तैनात करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रेसाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाकडून ८ सहायक पोलीस आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक, १९३ उपनिरीक्षक, १२५० अंमलदार, २५० वाहतूक अंमलदार, ६५० होमगार्ड यांचा समावेश आहे. तसेच एसआरपीएफच्या ३ कंपन्या, एनडीआरएफच्या २ तुकड्या, बीडीडीएसचे २ पथक मदतीला पाचारण करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये आणि आवश्यक त्या ठिकाणी पोलिस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने शहरात २३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. अनाउसिंग सिस्टीमद्वारे भाविकांना सुचना मिळणार आहे. यात्रेनिमित्त आलेल्या दिंड्यांच्या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग नेमण्यात येणार आहेत. सहा हाॅकर्स स्काॅड तैनात असणार आहे. 

भाविकांच्या वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा व स्थानिकांचे वाहनांकरिता गुलाबी रंगाचा असा वेगवेगळे पास तयार करण्यात आले आहेत. भाविक आणि स्थानिक नागरिकांना पाससाठी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करावा लागणार आहे. यात्रेदरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची तुडुंब गर्दी असणार आहे. त्यामुळे स्थानिक व भाविकांनी आपली वाहने १९ तारखेच्या आत पार्किंगचे ठिकाणी लावावीत आणि ती पुन्हा बाहेर काढू नये अशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, यात्राकाळात भाविकांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांशिवाय इतर वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणीकंद - मरकळ - आळंदी रस्ता बंद असून भाविकांनी दिंड्यांची वाहने इतर पर्यायी मार्गाने आळंदीत आणावीत असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरSocialसामाजिकPoliceपोलिस