स्थानिक गुन्हे शाखेचे वतीने १७ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईतील मुख्य आरोपींचा व इतर सुत्रधार यांचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीणच्या खेड-जुन्नर पथकाला मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आशिश बेल्हेकर हा नारायणगाव एस. टी. स्टँड येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्या नुसार स्था.गु.शा. पुणे (ग्रा) टीम ने नारायणगाव एस.टी स्टॅन्ड येथे सापळा रचून आशिष सुनील बेल्हेकर (वय २८, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) तयास ताब्यात घेतले. त्याचा मित्र पवन दत्तात्रय शेजवळ (रा. नारायणगाव) याच्या मदतीने ३ लाख ५ हजार रुपयांच्या १३ किंमतीच्या मोटार सायकली चोरल्याचेही कबूल करून चोरलेल्या १३ सर्व मोटार सायकली पोलिसांच्या स्वाधीन केल्या.
दुसऱ्या गुन्ह्यात पुणे जिल्ह्यातील नारायणगाव , आळेफाटा आणि नगर जिल्ह्यातील अकोले या ठिकाणी मोटारसायकल चोरणारे सचिन बाळु दिघे (वय ३१ रा. ढगेवाडी, पळसपुर , ता. पारनेर जि. अहमदनगर) आणि ऋशीकेष किसन दरेकर (वय २०, रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर) यांना २० डिसेंबर रोजी ताब्यात घेतले. त्यांनी ३ लाख ६ हजार रुपये किमतीच्या ११ मोटारसायकली चोरल्याची पोलिसांना कबुली दिली. ही कामगिरी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विक्रम तापकीर, हनुमंत पासलकर, दिपक साबळे, संदिप वारे, नीलेश सुपेकर, सचिन गायकवाड, राजु मोमीन, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे, प्रसाद पिंगळे यांनी केली आहे .
--
फोटो : २१ नारायणगाव मोटारसायकल चोर
फोटो -
मोटार सायकल चोरट्यांसह