पुणे : दोन शिक्षकांनी तब्बल २५ ंविद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज पसिरातील पुणे पालिकेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असून विद्यार्थिनींचेही जबाब घेतले आहेत. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. महिला सहाय्य कक्षाच्या वतीने शाळांमधून सुरू केलेल्या संवादामधून विद्यार्थिनींनी ही तक्रार केल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला सहाय्य कक्षाकडून सध्या शाळांमधून विद्यार्थिनींचे प्रबोधन सुरू आहे. महिला अधिकारी-कर्मचारी समुपदेशन करून संवाद साधत आहेत. या आठवड्यात महिला पोलिसांनी कात्रज येथील मनपाच्या शाळेमधील विद्यार्थिनींसोबत संवाद साधला. त्या वेळी काही विद्यार्थिनींनी दोन शिक्षक आमच्याशी असभ्य वर्तन करीत असल्याच्या तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत या शिक्षकांना बुधवारी चौकशीसाठी महिला सहाय्य कक्षामध्ये बोलावण्यात आले होते.शिक्षकांकडे चौकशी केली असून, त्यांनी आपल्याकडून चुकून घटना घडल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मुलींनाही बोलावून घेण्यात आले. मात्र, काही पालकांनी तक्रार देण्यास नकार दिला. केवळ चारच मुलींनी जबाब नोंदवले आहेत.
शिक्षकांकडून २५ विद्यार्थिनींचा विनयभंग
By admin | Published: July 28, 2016 4:05 AM