ओतूर शहरातील १ हजार ४१० पैकी १ हजार ४२४ बरे झाले आहेत. ३४ जण कोविड सेंटर, तर १० जण घरीच उपचार घेत आहेत. ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. नेतवड माळवाडी १२० पैकी १०३ बरे झाले. १० जण उपचार घेत आहेत, तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तेजेवाडी १०५ पैकी ९० बरे झाले आहेत, तर १४ जण उपचार घेत आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. बल्लाळवाडी १०७ पैकी ९६ बरे झाले आहेत, ७ जण उपचार घेत आहेत. ४ जणांचा मृत्यू झाला आहे. परिसरातील ३ हजार ३७१ पैकी ३ हजार ११८ जण बरे झाले आहेत. १०४ कोविड सेंटर, तर ३४ जण घरीच उपचार घेत आहेत. ११५ जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉ. श्रीहरी सारोक्ते म्हणाले.
ओतूर परिसरात दोन दिवसांत २५ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:13 AM