लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्य सरकारने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने केल्या जाणाऱ्या खासगी वाहतुकीत आता २५ टक्के वाहतूक ही राज्य परिवहन महामंडळाच्या मालवाहतूक (कार्गो) सेवे द्वारे करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एक समिती देखील गठन केली आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत होणार आहे.
राज्य सरकार खासगी वाहतूकदाराकडून मोठ्या प्रमाणात आपल्या विविध विभागाच्या संदर्भात सामानाची ने-आण करीत असते. पहिल्यांदाच माल वाहतुकीसाठी एसटीचा वापर करण्याचे ठरले. गठन केलेल्या समितीने एक महिन्याच्या आत आपला अहवाल राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश दिले. कोण कोणत्या वस्तूची वाहतूक एसटीने करायचे हे यात ठरविले जाणार आहे.
----------------------------------
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय योग्य आहे. यामुळे एसटीला मोठी आर्थिक मदत मिळेल. यासाठी राज्य सरकारचे आभार.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी, काँग्रेस ,मुंबई.