शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
2
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
3
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
4
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
5
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
6
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
7
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
8
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
9
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
10
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
11
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
12
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
13
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
14
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
15
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
16
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
17
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
18
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
19
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

२५ हजार किमी प्रवास दुचाकीवरून

By admin | Published: May 09, 2015 3:15 AM

नियोजन, जिद्द, चिकाटी आणि अपूर्व मनोबलाच्या जोरावर वेगळं काही तरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने सात राष्ट्रांचा दौरा, तोसुद्धा चक्क दुचाकीवर पूर्ण केला

पिंपरी : नियोजन, जिद्द, चिकाटी आणि अपूर्व मनोबलाच्या जोरावर वेगळं काही तरी करून दाखविण्याच्या ऊर्मीने सात राष्ट्रांचा दौरा, तोसुद्धा चक्क दुचाकीवर पूर्ण केला. सुखद, काही कटू अनुभव घेत, अडचणींवर मात करीत २५ हजार किलोमीटरचा प्रवास दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण करू शकलो, याचा मनस्वी आनंद वाटतो. हा अनुभव संस्मरणीय ठरणारा आहे. अशा भावना निगडी प्राधिकरण येथील राहुल देशमुख यांनी व्यक्त केल्या. दौरा यशस्वी केलेल्या पुत्राची भेट होताच, अभिमानाने ऊर भरून आलेल्या माता सुशीला यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.सुरक्षित वाहन चालविणे हा संदेश समाजापर्यंत घेऊन जाण्यासाठी मुंबई ते सिंगापूर व सिंगापूर ते पुणे असा सुमारे २५ हजार किलोमीटरचा दुचाकीवरचा प्रवास शहरातील राहुल देशमुख व पुण्यातील युहान मुबारकी यांनी केला आहे. सात राष्ट्रांचा हा प्रवास त्यांनी १८ मार्चला सुरू केला. ७ मे रोजी त्यांच्या दुचाकी दौऱ्याचा समारोप झाला. ४५ दिवसांत त्यांनी इंदोर, लखनौ, इंम्फाळ, इमोरेहा, म्यानमार, कंबोडिया, लाओस, व्हीएतनाम, थायलंड, बँकॉक, मलेशिया व सिंगापूर असा प्रवास केला. त्याचमार्गे ते परत आले. शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले. प्राधिकरणातील राहुल देशमुख व पुण्यातील युहान मुबारकी या दोन तरुणांनी दीड महिन्यात २५ हजार किलोमीटरचा दुचाकीवर प्रवास केला. त्यांच्या आई- वडिलांनी जिद्दी मुलांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक केले. (प्रतिनिधी)