शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

खडकवासला साखळीत २५ टीएमसी पाणी;  पावसाचा जोर कायम 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 12:30 PM

गेले चार दिवस होत असलेल्या पावसामुळे धरणात पाणी जमा होत आहे.

ठळक मुद्देउजनीत साडेबारा टीएमसी पाणीसाठागुरुवारी सायंकाळी खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर

पुणे : जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला आहे. गेले चार दिवस होत असलेल्या पावसामुळे धरणातपाणी जमा होत आहे. गुरुवारी सायंकाळी खडकवासला साखळीतील चारही धरणातील पाणीसाठा २५ अब्ज घन फुटांवर (टीएमसी) गेला. जिल्ह्यातील धरणातून होत असलेल्या विसगार्मुळे उजनी धरणात १२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.  शनिवारी (दि. २७) रात्री पासून जिल्ह्यात काही दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली. जवळपास पाच दिवस दमदार बरसल्यानंतर गुरुवारी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला. खडकवासला साखळीतील वरसगाव आणि पानशेत या दोनही धरणातील पाणीसाठा दहा टीएमसीच्या वर गेला आहे. टेमघर धरणात गुरुवारी सायंकाळी पाच पर्यंत ५५, वरसगाव ४६, पानशेत ३८ आणि खडकवासल्यात ८ मिलिमीटर पाऊस झाला. पानशेत धरणात १०.१९ (९५.७३ टक्के) टीएमसी साठा झाला असून, धरण भरण्याच्या मार्गावर आहे. वरसगाव धारणात १०.२० टीएमसी (७९.५७ टक्के), टेमघरमधे २.६१ टीएमसी (७०.४८ टक्के) आणि खडकवासला धरणात १.९७ टीएमसी (१०० टक्के) पाणीसाठा आहे. चारही धरणात मिळून २५ टीएमसी (८५.७० टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणातून मुठा नदीत २,५६८ क्सुसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर सकाळी अकरा वाजता त्यात ३,४२४ आणि दुपारी चार वाजता ९,४१६ क्सुसेक पाणी सोडण्यात येत होते. जिल्ह्यातील येडगाव धरणातून २१६५, वडज ८३७, चासकमान ७३२५, वडीवळे ७५३, आंद्रा १४६२ आणि कासारसाई धरणातून २०० क्सुसेकने पाणी सोडण्यात आले. सकाळी बंडगार्डन बंधाºयाजवळ १८ हजार २२१ क्सुसेकने होणारा विसर्ग सायंकाळी सहा पर्यंत २२ हजार ५५ क्युसेकपर्यंत वाढला होता. तर, दौंड येथे हा विसर्ग २४ हजार ३४८ क्सुसेक होता. त्यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी पाच पर्यंत धरणात ७.१६ टीएमसी साठा होता. त्यात गुरुवारी सायंकाळी पाच पर्यंत १२.५९ टीएमसी (२३.५० टक्के) पर्यंत वाढ झाली.   -- गुंजवणी, नीरा-देवघरचा साठा ८० टक्क्यांवरगुंजवणी धरणपाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभरात २६, निरा देवघर १९, भाटघर २५, वीर ९ आणि नाझरे धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणी धरणात ३.४९ (९२ टक्के), निरा देवघर ९.९१ (८४ टक्के), भाटघर धरणात १९.१० टीएमसी (८१ टक्के) आणि वीर धरणात ९ टीएमसी (९५ टक्के) पाणीसाठा झाला आहे. 

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी