पुणे : महापालिकेच्या वतीने शहरातील १८७ केंद्रांवर मंगळवारी २ नोव्हेंबरला प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहेत.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( १० ऑगस्ट पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचा ४ ऑक्टोबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे. त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.
सद्यस्थितीला शहरातील बहुतांशी नागरिकांचा लसीचा पहिला डोस पूर्ण झाला असून, ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे. त्यांना पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण होणे जरूरी आहे. यामुळे सध्या ही संख्या लसीच्या उपलब्धेपेक्षा निम्मीच आहे़. परिणामी शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर पुरवठा करण्यात आलेल्या लस शिल्लक राहत आहेत.