पुणे : पावसाळा सुरू झाल्याने पाणी साठून विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती होत आहे. पुणे महानगरपालिकेकडून खासगी ठिकाणी पाणी साठून त्यात डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. गेल्या आठवड्यात महापालिकेने एकूण २५ हजारांहून अधिक दंड विविध मिळकतींना ठोठावला आहे. तर जून महिन्यात २२ जूनपर्यंत १ हजार नऊशे १५ खासगी तर ६६0 सार्वजनिक ठिकाणी डासांची उत्पत्ती महापालिकेला आढळली आहे.पावसाळा सुरू झाला, की डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढते. तसेच या काळात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांच्या पेशंटचीही संख्या वाढते. साठलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती असते. घरात साठवून ठेवलेलेपाणी, घराच्या छतावर ठेवलेले टायर, शहाळी यांच्यामध्ये साठलेल्या पाण्यातही डासांची उत्पत्ती होतअसते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला पाणी साठून डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचेआवाहन पालिकेकडून करण्यात येते. त्याचबरोबर ज्या खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तांच्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती आढळते अशा मालमत्तांवर पालिकेकडून दंड स्वरूपात कारवाई करण्यात येते.या आठवड्यात केलेल्या कारवाईत महापालिकेने विविध मिळकतींना एकू्ण २५ हजारांहून अधिक दंड आकारला आहे. त्याचबरोबर १ जून ते २२ जूनपर्यंत १ हजार ९१५ खासगी तर ६६0 सार्वजनिक ठिकाणी डासांचीउत्पत्ती महापालिकेला आढळली आहे. पालिकेने १ हजार ४७२ मिळकतींना नोटिसाही पाठविल्या असून जनजागृती करणारी १ लाख७३ हजार ४६४ पत्रके वाटण्यातआली आहेत.डेंग्यू, मलेरिया आदी आजारांच्या डासांची उत्पत्ती कशी होते, या विषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर जनजागृतीपर पत्रकेही वाटण्यात येत आहेत. गेल्या आठवड्याभरात २५ हजार रुपयांंंंंंहून अधिक दंड विविध मिळकतींना ठोठावला आहे. आपल्या आजूबाजूला डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी नागरिकांनी घेणे आवश्यक आहे.- डॉ. संजय वावरे, सहायक आरोग्य अधिकारी
डास ‘पाळणाऱ्यां’ना २५ हजारांचा दंड, महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 5:00 AM