पुणे: शहरात रविवारी नव्याने २७४ कोरोनाबाधित आढळून आले असून, दिवसभरात २५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजमितीला शहरात २ हजार ४१९ सक्रिय रुग्ण आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार २७१ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.१९ टक्के इतकी आहे. आज १७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ११ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २९६ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४३१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ५१ हजार ७२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७७ हजार ५८४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६६ हजार ५९४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५७१ जणांचा मृत्यू झाला आहे.