पुरंदरमधील विविध ग्रामपंचायतीसीठी २३ तारखेला दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. तर आज गुरुवारी तब्बल २४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. असे एकूण आज अखेर २६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. २३ रोजी दाखल झालेल्या अर्जामध्ये भिवरी ग्रामपंचायतीतील प्रभाग नंबर १ साठी (अनुसूचित जाती) हरिदास वामन गायकवाड व प्रभाग नंबर २ साठी (अनुसूचित जमाती) दिपाली लक्ष्मण गायकवाड यांचा समावेश होता तर २४ डिसेंबर रोजी दाखल झालेले अर्ज असे : भिवडी प्रभाग नंबर १ सर्वसाधारण राहुल अंकुश मोकाशी. प्रभाग नंबर ३ सर्वसाधारण बाळू मच्छिंद्र पवार. भिवरी - प्रभाग नंबर २ सर्वसाधारण शेखर दत्तात्रय पिसे. प्रभाग नंबर २ नागरिकांनचा मागास प्रवर्ग स्त्री- मंगल दादासो घाटे. प्रभाग नंबर २ सर्वसाधारण स्त्री - रेश्मा मनोहर घाटे. प्रभाग नंबर २ सर्वसाधारण - मनोहर केरबा घाटे. खळद- प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण - हरिभाऊ तुकाराम फुले. प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण स्त्री ः शारदा बाळासाहेब कामठे. चांबळी ः प्रभाग नंबर २ सर्वसाधारण ः भाऊसाहेब लक्ष्मण कामठे. कोडीत बुद्रुक - प्रभाग नंबर १ सर्वसाधारण स्त्री - आशा किसन जरांडे. सुपे खुर्द - प्रभाग नंबर २ सर्वसाधारण - संतोष मारुती जगताप. तोंडल - प्रभाग नंबर ३ सर्वसाधारण - बाळासाहेब आण्णा बाबर. कुंभारवळण - प्रभाग नंबर १ सर्वसाधारण स्त्री - नीलम संतोष कुंभारकर. निरा- प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण - गणेश हनुमंत गडदरे. दत्ताजीराव रामराव चव्हाण. सर्वसाधारण स्त्री - हेमा उमेश चव्हाण. मनीषा राहुल शिंदे.
दिवे - प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण- अमित भाऊसाहेब झेंडे. प्रभाग नंबर ५ साधारण महिला-सुमन रमेश टिळेकर. प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण - तुषार गोकुळ झेंडे. प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण महिला - शोभा शिवाजी टिळेकर. प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण महिला- विमल मधुकर टिळेकर. प्रभाग नंबर ४ सर्वसाधारण- अनिल श्रीरंग झेंडे. प्रभाग नंबर ५ सर्वसाधारण - लाब गोविंद झेंडे. यापुढे तीन दिवस सलग सुट्ट्याचा कालावधी असल्याने उमेदवारांची मात्र दमछाक होणार आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल करण्यासाठी वेळ लागत असल्याचे झेंडेवाडीचे माजी उपसरपंच समीर झेंडे व राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव यांनी सांगितले.