पुणे : पुणे व पिंपरी-चिचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात पहिल्या ऑनलाईन प्रवेश फेरीतून प्रवेश मिळालेल्या ४८ हजार ३६४ विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर २१ हजार ९७५ विद्यार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी येत्या १७ व १८ जुलै रोजी प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या कालावधीत आपल्या अर्जात आवश्यक बदल करावेत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांनी सांगितले.अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने प्रवेश दिला जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून ६३ हजार ५६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरले होते.त्यातील ४८ हजार विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश दिले होते. या विद्यार्थ्यांनी १३,१५ व १६ जुलै रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक होते. परंतु, प्रवेश मिळालेला असताना २१ हजार ९५७ विद्यार्थी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर १३९ विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यात आले असून ७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत.मिनाक्षी राऊत म्हणाल्या, अकरावीसाठी प्रथम पसंतीक्रम दिलेल्या २४ हजार ३६४ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीतून प्रवेश दिला होता. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी पहिला पसंतीक्रम निवडलेल्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी दुसऱ्या व तिसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी पात्र असणार नाहीत. या विद्यार्थ्यांना तीन फेऱ्या झाल्यानंतर राबविल्या जाणाऱ्या विशेष फेरीतून प्रवेशाची संधी दिला जाईल.दुसºया प्रवेश फेरीसाठी १७ व १८ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अजार्चा पहिला भार भरला नाही. त्यांना पहिला भाग भरून अर्ज अप्रुह करून करता येईल. तसेच दुसरा भाग भरता येणार आहे. त्याचप्रमाणे या पूर्वी दुसरा भाग भरलेल्या विद्यार्थ्यांना सुध्दा महाविद्यालयाचे पसंतीक्रम तसेच शाखा व माध्यम बदलता येईल. तसेच येत्या २२ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी फेरी प्रसिध्द केली जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
.......
अकरावी प्रवेश प्रक्रिया: दुसऱ्या यादीसाठी १७ व १८ जुलै अर्ज करता येणारपहिल्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मंगळवारी(दि.१६) दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र, अनेक विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेशासाठी हजर होते. त्यामुळे प्रवेशाची मुदत सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.