शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

गुंतवणूक २६७ कोटींची, वसुली १०७३ कोटी

By admin | Published: September 23, 2015 3:05 AM

पुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’बरोबरच पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे रुंदीकरण करुन त्यावरही टोल आकारण्यास सुरुवात झाल्यापासून जून २०१५ अखेर या महामार्गावर

विवेक भुसे, पुणेपुणे-मुंबई ‘एक्सप्रेस वे’बरोबरच पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ चे रुंदीकरण करुन त्यावरही टोल आकारण्यास सुरुवात झाल्यापासून जून २०१५ अखेर या महामार्गावर तब्बल १०७३ कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आला असून उद्दिष्टापेक्षा तो कितीतरी अधिक झाला आहे़ विशेष म्हणजे या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी आयआरबीने केवळ २६७ कोटी रुपये गुंतवले आहेत़ गेल्या ११ वर्षापासून गोपनीय ठेवलेली ही कागदपत्रे राज्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिलेल्या आदेशामुळे रस्ते विकास महामंडळाने शेवटी नाईलाजाने वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली आहे़ पुणे-मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला त्यावर टोल देण्यापेक्षा जुन्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरुन जाण्याला वाहनचालक पसंती देत होते़ त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करुन त्यावरही टोल आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ त्यानुसार हे काम आयआरबीला देण्यात आले़ राज्य रस्ते विकास महामंडळाबरोबर झालेल्या करारानुसार आयआरबी कंपनीने एक्सप्रेस वे व महामार्ग क्रमांक ४ साठी एकरक्कमी ९१८ कोटी रुपये देऊन दोन्ही महामार्गावरील टोल वसुलीचा ठेका घेतला़ सप्टेंबर २००६ पासून टोल वसुलीस सुरुवात झाली़ आयआरबीने २००६-०७मध्ये ६०़४९ कोटी रुपये टोल वसुल होईल, असे गृहीत धरले होते़ प्रत्यक्षात सप्टेंबर ते डिसेंबर २००६ या चार महिन्यात २२ कोटी ३२ लाख ८४ हजार रुपये आणि २००७ या वर्षात ८१ कोटी ७६ लाख ६७ हजार ८२२ रुपये टोल वसुल केला आहे़ डिसेंबर २०१४ अखेर कंपनीने ९८२ कोटी ८७ लाख ६६ हजार ३२३ रुपये टोल वसुल केला आहे़ (प्रतिनिधी)