परिसरात सोमवारी २४ आणि मंगळवारी २७ रुग्ण संख्या वाढताना निदर्शनास आले आहे, ओतूर परिसरातील बाधितांची संख्या १ हजार ७९८ झाली आहे, त्यातील १ हजार ५०२ बरे झाले आहेत. १६८ रुग्ण कोविड सेंटरमध्ये, तर ५७ जण घरीच उपचार घेत आहेत. आजपर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी डिंगोरे ५, धोलवड १, आंबेगव्हाण ४, ओतूर शहर ९, नेतवड माळवाडी ४, रोहोकडी १, डुंबरवाडी २, पाचघर १ असे २७ नवीन रुग्ण सापडले आहेत अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
ओतूर शहरातील बाधितांची संख्या ८१९ झाली असून, त्यातील ७२० जण बरे झाले आहेत, तर ७१ जण उपचार घेत आहेत. २८ जणांचा मृत्यू झाला आहे.