ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत बुधवारी २८ नवे रुग्ण सापडल्याने परिसरातील बाधितांची संख्या १ हजार २५६ झाली इतकी आहे. त्यापैकी १ हजार ५३ रुग्ण बरे झाले आहेत तर १३८ जणांवर कोव्हीड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत तर ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती ओतूर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.
बुधवारी ओतूर शहरात नवीन १६ रुग्ण सापडले आहेत त्यामुळे तेथील बाधितांची संख्या ६४१ झाली आहे. ५४१ बरे झाले आहेत ६६ जण कोव्हीड सेंटर तर ९ जण घरीच उपचार घेत आहेत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य केंद्रात सापडलेल्या रुग्णांची गावनिहाय संख्या अशी - नेतवड माळवाडी ३ उदापूर ३ ,आलमे ३,बल्लाळवाडी १ रोहोकडी १ ,पाचघर १ असे २८ नवीन रुग्ण सापडले आहेत नेतवड माळवाडी येथील बाधितांची संख्या २३ ,झाली आहे २० बरे झाले आहेत ३ जण उपचार घेत आहेत. बल्लाळवाडी तील बाधितांची संख्या ६३ झाली आहे ५३ बरे झाले आहेत ३ जण उपचार घेत आहेत ३ ,जणांचा मृत्यू झाला आहे . उदापूर येथील बाधितांची संख्या ५७ झाली आहे ३९ बरे झाले आहेत .१२ कोव्हीड सेंटर तर एक जण घरीच उपचार घेत आहे ५ ,जणांचा मृत्यू झाला आहे. रोहोकडी येथील बाधितांची संख्या ४८ झाली आहे ४५ बरे झाले आहेत एक जणावर उपचार सुरु केले आहेत .२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पाचघर येथील बाधितांची संख्या १४ झाली आहे १० बरे झाले आहेत २ ,जण कोव्हीड सेंटर १घरीच उपचार घेत आहे आलमे येथील बाधितांची संख्या१४ झाली आहे ९ बरे झालेले आहेत ४जण उपचार घेत आहेत एकाचा मृत्यू झाला आहे.