पुणे : अकरावीच्या प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी करण्यास गुरुवारपासून (१० मे) सुरुवात झाली आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीचा निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे आवश्यक आहे.केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी १२ हजार ९०९ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून सबमिट झाले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमध्येच आॅनलाइन अर्ज भरून तो मुख्याध्यापकांकडून अॅप्रुव्ह करून घ्यावा लागेल. मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या अकरावी आॅनलाइन अर्ज भरण्याचे नियोजन करायचे आहे.>युजर आयडी, पासवर्डचा वापर करून अर्जअकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिकांचे सर्व माध्यमिक शाळांमध्ये वितरण करण्यात आले आहे. या माहिती पुस्तिकेमधील युजर आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे.
२८ हजार विद्यार्थ्यांची अकरावीसाठी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 1:46 AM