पुणे : गेल्या नऊ दिवसात राज्यात काेरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये, बी.ए. ४ व ५ चे नवे ७३ तर बी.ए. २.७५ चे नवे २०९ असे एकूण २८२ रुग्ण आढळले आहेत. राज्यात १० ते १९ ऑगस्ट या कालावधीतील प्रयोगशाळांच्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.
राज्यात नवीन काेराेनाचा विषाणू येताेय का हे पाहण्यासाठी ‘इन्साकॉग' या माेहिमेअंतर्गत ७ प्रयोगशाळांच्यामार्फत काेरोना विषाणूंचे जिनोम सिक्वेन्सिंग नियमित राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. त्यानुसार बी ए २.३८ या पूर्वी सर्वाधिक प्रमाणात असणाऱ्या उपप्रकाराचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या ३४८ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या ४५९ झाली आहे.
जिल्हा निहाय बी ए. ४ आणि ५ :
पुणे - २३५, मुंबई -७२, ठाणे - १६, रायगड आणि नागपूर - प्रत्येकी ७,
सांगली-६, पालघर - ४, कोल्हापूर -१.
जिल्हा निहाय बी ए.२.७५ :
पुणे -२३४,मुंबई -१३१, नागपूर -४४, यवतमाळ -१९, चंद्रपूर -१७,
सोलापूर -९, अकोला आणि वाशिम - प्रत्येकी २, सांगली - १.