बँकेच्या ठेवींतही वाढ होऊन ११ हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. नेट एनपीए शून्य टक्के असून बँकेने हा मोठा उच्चांक केलेला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी दिली.
थोरात म्हणाले,
मार्च २०२१ अखेर बँकेची एकूण उलाढाल १९ हजार १९८ कोटी ५५ लाख रुपयांची असून सभासद संख्या १० हजार ९६४ एवढी आहे. त्यापैकी ९२३१ सहकारी संस्था व १७३३ व्यक्ती सभासद आहेत. बँकेचे भागभांडवल ३३८ कोटी ८० लाख रुपये आहे
विकास संस्थांनी व शेतकरी सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्याने बँकेचा ग्रॉस व नेट एनपीए नाबार्डच्या निकषानुसार निश्चित केलेल्या मर्यादेच्या आत आणण्यामध्ये बँकेला यश प्राप्त झाले आहे.
साखर कारखाने, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, वैयक्तिक कर्जदार यांना विविध प्रकारचा कर्जपुरवठा केलेला आहे.
बँकेने ५२३३ कोटी ८१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे असून, बँकेचे नेटवर्थ ८१० कोटी १२ लाख रुपये आहे. तसेच बँकेचा सीडी रेशो ७३.१५ टक्के व सीआरएआर ११.७४ टक्के आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या १०४ वर्षांच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठा नफा प्रथमच झाला आहे. गेल्या अर्थिक वर्षात २७४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. यामध्ये ८ कोटी ५० लाखांची वाढ झाली आहे. ठेवींमध्येही १००० कोटींची वाढ झाली आहे, असेही ते थोरात यांनी सांगितले.