त्यामुळे पुन्हा चिंतेचे ढग इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागावर येऊन ठेपतील याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
गर्दी पुन्हा गावोगावी दिसू लागली असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. शहरी भागातील बँका, बाजारपेठ येथे विनाकारण कोरोना प्रादुर्भाव प्रचंड असताना देखील, गर्दी दिसते आहे. त्यामुळे कोरोना आजार इंदापूर तालुक्याची पाठ सोडण्यास तयार नाही. प्रशासन रोज कारवाई करून हतबल होतात. मात्र नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे कोरोना बाधित होऊन अनेकांचे प्राण जात आहेत. तालुक्यातील खासगी व सरकारी दवाखाने रुग्णांनी तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे कोणावर उपचार करायचा असा प्रश्न देखील पुढे येत आहे.
बारामती तालुक्याप्रमाणे इंदापूर तालुक्यात देखील कडक निर्बंध घालण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. दररोज तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात अटकाव येऊ शकतो. विविध प्रकारची दुकाने प्रशासनाच्या भीतीमुळे चोरून गर्दी करून दुकानातील मालाची विक्री केली जाते. मात्र, यामध्ये ग्राहक तसेच दुकानदार व सततची असणारी वर्दळ यामुळे ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढती आहे. त्यामुळे शेजारच्या बारामती तालुक्याप्रमाणे इंदापूर तालुक्यात अत्यंत कडक निर्बंध घालण्याची मागणी पुढे येत आहे.
--
फोटो क्रमांक : ०६इंदापूर कोरोना बाधीत
फोटो ओळ : इंदापूर शहरातील बँकेसमोर प्रचंड ग्राहकांची गर्दी