शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

सासवड येथे २८६ विविध खटले निकाली

By admin | Published: April 10, 2017 2:07 AM

तालुका विधी सेवा समिती आणि सासवड बार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये

सासवड : तालुका विधी सेवा समिती आणि सासवड बार यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये विविध विभागांची सुमारे २७ लाख रुपये इतकी विक्रमी वसुली करण्यात आली. तसेच सुमारे २८६ विविध खटले तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले, अशी माहिती बारचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश जाधव यांनी दिली. या लोकअदालतमध्ये यामधील मुख्य दिवाणी न्यायाधीश न्या. जाधव यांच्याकडील दिवाणी, फौजदारी, १३८ यांची सुमारे २९३ खटले, सहन्यायाधीश दिंडे यांचेकडील २८२ तसेच न्यायाधीश साळुंखे यांचेकडील १२५ असे एकूण ७०० खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र वीज मंडळाकडील सासवड विभागातील ४०० आणि नीरा विभागातील २९४ प्रकरणे, सासवड नगरपालिकेकडील ४७३ प्रकरणे, तर ग्रामपंचायतीपैकी मावडी कपची - २८०, पिंपळे - १६७, पिंगोरी - ११४, पिंपरे खुर्द - १३०, जेऊर - ११३, पारगाव मेमाणे - २०७, कोडीत खुर्द - ८४, वाल्हे - १४७, अशी एकूण २४४५ प्रकरणे असून, सर्व मिळून सुमारे ३०४७ इतकी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखल दिवाणी व फौजदारी एकूण ६३ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन २० लाख ८८ हजार ५०० इतकी वसुली करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, सासवड नगरपालिका, तसेच ग्रामपंचायत यांची ६ लाख १२ हजार ५४४ रुपये विविध करांपोटी तडजोड करून वसुली करण्यात आली. अशी एकूण २७ लाख १०४४ इतकी वसुली झाली. या वेळी सहन्यायाधीश व्ही. बी. साळुंखे तसेच बारचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश जाधव, उपाध्यक्ष अ‍ॅड. सचिन कुदळे, अ‍ॅड. विलास खंडाळकर, अ‍ॅड. प्रशांत यादव, अ‍ॅड. अशोक भोसले, अ‍ॅड. बापुसो गायकवाड, प्रकाश बोत्रे, अ‍ॅड. बापूसो जगताप, अ‍ॅड. विशाल पोमण, पंढरीनाथ झेंडे, अ‍ॅड. तुषार मिरजकर, अ‍ॅड. राणी यादव, अ‍ॅड. सुनीता सस्ते, अ‍ॅड. प्रदीप धुमाळ, अ‍ॅड. दिगंबर पोमण, तसेच इतर वकील मंडळी, सहायक अधीक्षक श्रीमती पंत, श्रीमती खिरीड, कर्मचारी परशुराम देशमुख, बोत्रे आदी उपस्थित होते.दरम्यान, दुपारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. कर्णिक यांनी सासवड न्यायालयात भेट देऊन लोकन्यायालयाची पाहणी केली. तसेच कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या वेळी बारचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश जाधव यांनी कर्णिक यांचे बारच्या वतीने स्वागत केले. पॅनल जज म्हणून अ‍ॅड. अण्णासो खाडे, अ‍ॅड. बापूसो जगताप, अ‍ॅड. सुनील कटके, अ‍ॅड. तुकाराम पवार, अ‍ॅड. अश्पाक बागवान यांनी काम पहिले.